आशादायक : कऱ्हाड झाले कोरोनामुक्त

corona virus update
corona virus updatesakal media
Updated on
Summary

शहर दुसऱ्या लाटेतही कोरोनामुक्त झाले आहे.

कऱ्हाड (सातारा): कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सप्टेंबरलाच कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यात कऱ्हाड शहरही कोरोनामुक्त झाले आहे. शहरात एकमेव अॅक्टिव्ह रुग्णासही डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे शहर कोरोनामुक्त झाले आहे. पहिल्या लाटेत २२ मे २०२० रोजी शहर जिल्ह्यात सर्वात आधी कोरोनामुक्त झाले होते. त्यानंतर शहर दुसऱ्या लाटेतही कोरोनामुक्त झाले आहे.

corona virus update
नांदलापुरला 15 दगडखाणी सील! कऱ्हाड तहसीलदारांच्या कारवाईचा धडाका

पालिका आणि नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गेले दीड वर्ष उपाययोजना करण्यात येत आहे. पहिल्या लाटेत २२ मे २०२० रोजी शहर कोरोनामुक्त झाले होते. त्या वेळी रुग्णसंख्या कमी होती. मात्र, या लाटेचा पीक ऑगस्ट- सप्टेंबर २०२० मध्ये आला होता. त्या वेळी जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा हॉटस्पॉट कऱ्हाड शहर व तालुका झाला होता. त्या वेळी नगरपालिकेने अथक परिश्रम घेऊन संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले होते.

corona virus update
मुंबई पोलिसांनंतर किरीट सोमय्यांना कऱ्हाड पोलिसांनी घेतलं ताब्यात

मार्च २०२१ पासून दुसरी लाट सातारा जिल्ह्यात सुरू झाली. मात्र, दुसऱ्या लाटेत सातारा हा प्रथम क्रमांकाचा हॉटस्पॉट झाला. जिल्ह्याची सर्वाधिक रुग्णसंख्या व मृत्युसंख्या साताऱ्यात नोंद झाली होती. आता लाट ओसरत असताना साताऱ्यात रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. दरम्यानच्या काळात कऱ्हाड तालुक्यातही रुग्णवाढ झाली होती. मात्र, महिनाभरात ती आटोक्यात आली. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांत कऱ्हाड शहर व तालुक्यात नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाले होते. गेल्या आठवड्यात शहरात केवळ एकच रुग्ण अॅक्टिव्ह होता. या रुग्णास मंगळवारी घरी सोडण्यात आले. त्यामुळे कऱ्हाड शहर कोरोनामुक्त झाले आहे. नगरपालिका व नागरी आरोग्य केंद्राने याकामी घेतलेल्या परिश्रमांना यश मिळाले आहे. कऱ्हाड शहरात आजअखेर एकूण ७ हजार ३७९ कोरोनाचे रुग्ण आहेत. सध्या एकही रुग्ण अॅक्टिव्ह नाही. आजअखेर १४१ जणांना मृत्यू झाला आहे.

corona virus update
कऱ्हाड-पुणे थेट एसटी बससेवा

संभाव्य तिसऱ्या लाटेपूर्वी शहरात जास्तीतजास्त लसीकरण करण्यासाठी नगरपालिका व नागरी आरोग्य केंद्र प्रयत्न करत असल्याची माहिती नागरी आरोग्य केंद्राच्या डॉ. शीतल कुलकर्णी यांनी दिली. बुधवारी नागरी आरोग्य केंद्रात २४३ व शाळा क्रमांक नऊमध्ये ११६ जणांना लसीकरण करण्यात आले. पालिकेला फिरती लसीकरण केंद्र सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे नागरी आरोग्य केंद्रासह शहरात दोन लसीकरण केंद्र सुरू राहणार आहेत. सद्यःस्थितीत नागरी केंद्रासह शाळा क्रमांक नऊमध्ये लसीकरण सुरू आहे. याशिवाय यानंतर शहरात विविध भागात केंद्र उघडण्यात येणार असून, यासाठी नगरसेवकांची मदत घेण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. शीतल कुलकर्णी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.