Khambatki Ghat : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाट पुन्हा जाम; सकाळपासून घाटात वाहनांच्या लांबलचक रांगा

आज सकाळी साडेसात वाजता खंबाटकी घाटात दोन ट्रक बंद पडल्याने हळूहळू वाहनांच्या रांगा लागायला सुरुवात झाली.
Khambatki Ghat Jam
Khambatki Ghat Jamesakal
Updated on
Summary

खंबाटकी घाटात केवळ कंटेनर किंवा ट्रक बंद पडून पाच ते सहा तास वाहतूक टप्प होण्याच्या घटना नेहमी घडत आहेत.

खंडाळा : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात आज दोन ट्रक बंद पडल्याने या रविवारीही खंबाटकी घाट जाम झाला. सध्या पुणे आणि सातारा दोन्ही बाजूकडून घाट जाम झाल्याने खंबाटकी घाटातील दोन्ही बाजूकडील वाहतूक पूर्णपणे ठप्प झालीये.

यातच पाऊस सुरू असल्याने प्रवासी व वाहनचालकांचे मोठे हाल होत आहेत. याबाबत माहिती अशी की, आज सकाळी साडेसात वाजता खंबाटकी घाटात दोन ट्रक बंद पडल्याने हळूहळू वाहनांच्या रांगा लागायला सुरुवात झाली.

Khambatki Ghat Jam
Almatti Dam : महाराष्ट्राच्या विनंतीवरुन आलमट्टी धरणातून तब्बल 1 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग; महापुराचा धोका टळला?

लोणावळामधील पर्यटनस्थळ बंद असल्याने अनेक पर्यटक महाबळेश्वर, तापोळा, कास पठार, ठोसेघर व इतर ठिकाणी जात असल्याने व रविवार विकेंड असल्यामुळे या मार्गावरील वाहनांची संख्या सर्वाधिक आहे. परिणामी, एक जरी वाहन बंद पडले की, या घाटात वाहनांच्या रांगा लागतात. येथील दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प होते. खांबाटकी घाटात क्रेन उपलब्ध नसल्याने ह्या घटना वारंवार घडत आहेत. यामुळे येथे क्रेन लगेच उपलब्ध करावी, अशी मागणी जोर धरू लागलीये.

Khambatki Ghat Jam
Para Olympic च्या आखाड्यात माणदेशातील दोन रत्ने; गोळाफेकीत सचिन खिलारी, तर बॅडमिंटनमध्ये सुकांत कदम सहभागी होणार

"रविवार आला की, खंबाटकी घाट जाम झाला"

"रविवार आला की, खंबाटकी घाट जाम झाला" अशी या घाटाची स्थिती झालीये. खंबाटकी घाटात केवळ कंटेनर किंवा ट्रक बंद पडून पाच ते सहा तास वाहतूक टप्प होण्याची घटना नेहमी घडत आहे. यामुळे विकेंडला खंबाटकी घाटातून जाताना अनेक जण काळजीनेच बाहेर पडताना दिसत आहेत. जूनपासून सलग चार रविवारी हा घाट जाम राहिला आहे. तरी याकडे दुर्लक्ष करू नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.