Monsoon Season : खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या; पावसाअभावी शिवारं पडली कोरडी, शेतकऱ्यांत चिंता

जून महिना संपून जुलै सुरू झाला. अद्याप मोसमी पावसाची (Rainy Season) विभागात दमदार हजेरी लागली नाही.
Rainy Season Kharif Crops
Rainy Season Kharif Cropsesakal
Updated on
Summary

कोरड्या रानाला नैवेद्य दाखवण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली आहे. मागील दहा वर्षांपूर्वी अशी स्थिती निर्माण झाली होती.

विंग : जून महिना संपून जुलै सुरू झाला. अद्याप मोसमी पावसाची (Rainy Season) विभागात दमदार हजेरी लागली नाही. जमिनीत चार इंचही ओलावा नाही. परिणामी, खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. या महिन्यात पीक कोळपणीला येते.

Rainy Season Kharif Crops
Nana Patole : 'फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जे पाप घडलंय, त्याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील'

यंदा मात्र उलट चित्र असून, शिवारे पावसाअभावी कोरडी दिसून येत आहेत. यंदाचा बेंदूर कोरडाच गेला आहे. कोरड्या रानाला नैवेद्य दाखवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. प्रतिवर्षी जूनच्या प्रारंभी मोसमी पावसाला अपेक्षित प्रारंभ होतो. यंदा, मात्र विंग परिसरात उलट चित्र आहे.

संपूर्ण जून कोरडाच गेला आहे. जुलै सुरू झाला आहे. केवळ रिपरिप सुरू झाली आहे. मात्र, पावसाचा जोर अद्याप नाही. कधी ढगाळ वातावरण तरी कधी ऊन असे चित्र परिसरात दिसून येत आहे. जिल्ह्याच्या अन्य भागात पावसाचा जोर असला तरी, कऱ्हाड तालुक्यात विंग विभागात पावसाचा जोर मंदावला आहे.

Rainy Season Kharif Crops
Radhanagari : हसन मुश्रीफांचा 'दोस्त' कोणाला साथ देणार? साहेब की दादा, 'केपीं'च्या राजकीय भूमिकेकडं लक्ष्य

जमिनीत पुरेसा ओलावा नाही. चार इंचही ओल गेलेली नाही. पुरेशा ओलाव्याअभावी खरिपाच्या बहुतांशी पेरण्या येथे खोळंबल्या आहेत. पेरणीसाठी खरेदी केलेले बियाणे घरातच पडून आहेत. पावसाच्या भरवशावर विभागात क्वचित ठिकाणी कोळे, आणे परिसरात पेरणी आणि टोकणीची कामे शेतकऱ्यांनी हाती घेतली आहेत. पावसाची चिंता मात्र त्यांच्यात कायम आहे. यंदाचा बेंदूर सण कोरडाच गेल्याची स्थिती आहे.

Rainy Season Kharif Crops
Siddheshwar Factory : चिमणीच्या पाडकामानंतरही विमानाचं उड्डाण अवघड; 62 एकराचा वाद, 105 अडथळे

कोरड्या रानाला नैवेद्य दाखवण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली आहे. मागील दहा वर्षांपूर्वी अशी स्थिती निर्माण झाली होती. तत्पूर्वी २००० मध्येही तीच स्थिती होती, असे शेतकरी सांगत आहेत. गतवर्षी या दिवसात खरिपाची पिकात कोळपणी सुरू होती. बेंदराला शिवारे हिरवेगार दिसत होती. शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण होते. बेंदूर सण उत्साहात साजरा केला. यंदा मात्र उलट चित्र असून, शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.