आई-वडिलांच्या किडन्यांमुळं मुलांना मिळालं जीवदान; कृष्णा हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया

कृष्णा हॉस्पिटलमध्ये (Krishna Hospital) ही अवघड शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे यशस्वी झाली आहे.
Krishna Hospital Karad
Krishna Hospital Karadesakal
Updated on
Summary

कृष्णा हॉस्पिटलने माफक दरात ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली असून, आतापर्यंत २७ किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हॉस्पिटलने यशस्वीपणे केल्या आहेत.

कऱ्हाड : उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील एका खेड्यात वडापावचा गाडा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या मातेने आपल्या १८ वर्षीय मुलाला आणि अक्कलकोट (Akkalkot) जवळच्या एका खेड्यातील ऊसतोड मजूर पित्याने २३ वर्षीय मुलाला किडनी देऊन त्यांना जीवदान दिले. कृष्णा हॉस्पिटलमध्ये (Krishna Hospital) ही अवघड शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे यशस्वी झाली आहे. नवीन तंत्रज्ञानाने अवघ्या ११ दिवसांतच चारही जणांना हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले आहे.

Krishna Hospital Karad
UNESCO : शिवछत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या 'प्रतापगड'ची वारसा स्थळासाठी शिफारस; 'या' 12 किल्ल्यांचाही समावेश

उस्मानाबाद जिल्ह्यात राहणाऱ्या एका युवकाची आई (Mother) उदरनिर्वाहासाठी वडापावचा गाडा चालवते. त्याला लहानपणापासूनच किडनीचा विकार होता. सहा महिन्यांपूर्वी त्या युवकाचे दुखणे बळावले आणि डॉक्टरांनी नियमित डायलिसिस करण्याची सूचना केली. त्याला तो युवक कंटाळला होता, तर सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात राहणाऱ्या एका युवकाचीही हीच स्थिती होती.

त्याचे वडील ऊसतोड मजूर म्हणून काम करतात. घरच्या या हलाखीच्या परिस्थितीमुळे त्या युवकाने डिप्लोमाचे शिक्षण अर्धवट सोडून गाडी चालविण्याचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र, त्याचदरम्यान त्याला किडनी विकार जडला. त्याच्यावरही पाच महिन्यांपासून डायलिसिस उपचार सुरू होते.

Krishna Hospital Karad
गिरणीत हात गमावला, पतीचं निधन झालं, पण इच्छाशक्ती नाही ढळली..; गिरगावच्या लता चव्हाणांची प्रेरणादायी कहाणी

सोलापूर जिल्ह्यातील एका हॉस्पिटलमध्ये दोन्ही युवकांच्या कुटुंबीयांची ओळख झाली. दोन्ही कुटुंबांना किडनी ट्रान्सप्लान्टची चिंता होती. त्यांनी येथील कृष्णा हॉस्पिटलबाबत माहिती समजली. त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या वैशाली यादव यांच्याकडून माहिती घेतली.

कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पिटलच्या किडनी प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख डॉ. आर. जी. नानिवडेकर यांच्या निर्देशानुसार किडनी ट्रान्स्प्लान्ट सर्जन डॉ. अमोलकुमार पाटील, युरॉलॉजिस्ट डॉ. योगेश जाधव, नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. राहुल पाटील या तज्ज्ञ डॉक्टरांच्या वैद्यकीय टीमसह अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने या दोघांवर उपचार सुरू झाले. एका युवकसाठी त्याच्या आईने, तर दुसऱ्या युवकासाठी त्याच्या वडिलांनी किडनी दान करून मुलांना जीवदान दिले.

Krishna Hospital Karad
नात्याला काळिमा फासणारी घटना! पोटच्या अल्पवयीन मुलीवरच बापानं केला अत्याचार; मुलगी गरोदर राहिल्यानंतर घटना उघड

पहिल्यांदाच दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया

कृष्णा हॉस्पिटलने माफक दरात ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली असून, आतापर्यंत २७ किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हॉस्पिटलने यशस्वीपणे केल्या आहेत. त्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करण्यात आल्या. हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांनी ही अवघड शस्त्रक्रिया सहजसाध्य केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.