सातारा : किसनवीर कारखान्यांत अखेर सत्तांतर; आबा, काकांचीच जादू चालली

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील मोठ्या मताधिक्याने सत्ता काबीज
Kisan Veer Satara Cooperative Sugar Factorie election NCP won all seat large margin Makrand Patil satara
Kisan Veer Satara Cooperative Sugar Factorie election NCP won all seat large margin Makrand Patil satara sakal
Updated on

वाई : भुईंज (ता.वाई) येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आज १९ वर्षांनंतर सत्ता परिवर्तन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर कारखाना बचाव शेतकरी पॅनेलने सर्व २१ जागा मोठ्या मताधिक्याने जिंकून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करताना कारखान्याची सत्ता काबीज केली. तर विद्यमान चेअरमन, माजी आमदार, भाजपा नेते मदन भोसले यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ शेतकरी विकास पॅनलला एकही जागा मिळाली नाही.

कारखान्याच्या संचालक मंडळातील २१ जागांसाठी ४६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यासाठी कार्यक्षेत्रातील वाई, खंडाळा, जावली, कोरेगाव, सातारा व महाबळेश्वर या सहा तालुक्यातील एकूण १५४ मतदान केंद्रावर मंगळवारी (ता.३) ६९.३१ टक्के मतदान झाले. यावेळी ५१ हजार ११६ ऊस उत्पादक सभासदापैकी ३५ हजार ५७१ तर संस्था सभासद ३७४ पैकी ३३१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. यावेळी सत्तारूढ शेतकरी विकास पॅनल आणि विरोधी किसन वीर कारखाना बचाव शेतकरी पॅनल याच्यामध्ये चुरशीची लढत झाली.याशिवाय चार अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात होते. आज सकाळी वाई औद्योगिक वसाहतीतील श्रीनिवास मंगल कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. त्यासाठी ७७ टेबलवर सोय करण्यात आली होती. प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक व तीन सहाय्यक कर्मचारी यांनी मतमोजणीचे काम केले.

एका टेबलवर दोन पेट्याची मोजणी करण्यात आली. त्यानुसार दोन फेऱ्या झाल्या. राखीव गटातील पहिल्या फेरीचे ११ वाजता एका पाठोपाठ जाहीर करण्यात आले. यावेळी किसनवीर कारखाना बचाव शेतकरी पॅनेलचे उमेदवार साडेतीन ते चार हजार मतांनी आघाडीवर राहिले. त्यानंतर ऊस उत्पादक गटाचे फेरी जाहीर करण्यात आली. त्यानंतर दुपारी दोन वाजता दुसऱ्या फेरीच्या मताची मोजणी सुरू झाली. सायंकाळी साडे चार वाजता सोसायटी मतदार संघाचा निकाल जाहीर झाला. यावेळी आमदार मकरंद पाटील १४७ मतांनी विजयी झाल्याने प्रवेश द्वारावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. त्यानंतर राखीव आणि ऊस उत्पादक गटाचे अंतिम निकाल जाहीर करण्यात आले. या निवडणुकीत विद्यमान दहा संचालक पराभूत झाले तर संचालक सचिन साळुंखे किसन वीर कारखाना बचाव पॅनल मधून विजयी झाले. किसन वीर बचाव पॅनेलचे सर्व उमेदवार ८ ते ९ हजार मताच्या फरकाने विजयी झाले.

विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते:-

  • कवठे - खंडाळा गट क्र १:- रामदास संपतराव लगाढवे, खंडाळा ( २२१५५ ), नितीन लक्ष्मणराव जाधव - पाटील, बोपेगाव(२२२४४), किरण राजाराम काळोखे, खानापूर (२१७१६).

  • भुईंज गट क्र २:- प्रकाश लक्ष्मण धुरगुडे भिरडाचीवाडी (२१६७९), रामदास महादेव इथापे शिरगाव ( २१५६८), प्रमोद भानुदास शिंदे जांब, (२१५०७).

  • वाई - बावधन जावली गट क्र ३:-दिलीप आनंदराव पिसाळ बावधन (२२३५९), शशिकांत मदनराव पिसाळ, बावधन (२२०५८),:हिंदुराव आनंदराव तरडे, बामणोली तर्फ कुडाळ (२१४६९),

  • सातारा गट क्र ४:- संदीप प्रल्हाद चव्हाण (२२११०), सचिन हंबीरराव जाधव (२२०३६) बाबासाहेब शिवाजी कदम (२१८३३),

  • कोरेगाव गट क्र ५:- ललित जोतिराम मुळीक (२१५६७), संजय अरविंद फाळके (२१६७३), सचिन घनश्याम साळुंखे (२१५३२)

  • महिला राखीव :- सुशीला भगवानराव जाधव (२२३९४), सरला श्रीकांत वीर (२१५६२).

  • संस्था मतदार संघ:- मकरंद लक्ष्मणराव जाधव पाटील (२३८)

  • अनुसूचित जाती जमाती राखीव:- संजय निवृत्ती कांबळे (२२७२४)

  • भटक्या / विमुक्त जमाती / विशेष मागासहणमंत बाबासाहेब चवरे (२२६६१).

  • इतर मागास प्रवर्ग:- शिवाजी बंडू जमदाडे (२२६१०).

किसन वीर कारखाना निवडणुकीतील विजय ५२ हजार शेतकरी सभासद व कामगारांचा आहे. गेली १७-१८ वर्षे सत्तारूढ मंडळींनी चुकीच्या पद्धतीने कामकाज केले. प्रचंड भ्रष्टाचार केला. शेतकऱ्यांची देणी दिली नाहीत. उलट कारखान्यावर कर्जाचा डोंगर करून ठेवला. कामगारांना वेळेवर वेतन दिले नाही. त्यामुळे किसन वीर यांनी स्थापन केलेले आणि शेतकऱ्यांचे वैभव असलेले सहकार मंदिर रसातळाला गेले. परिणामी कारखान्यात सत्तांतर घडले.

-आमदार मकरंद पाटील, वाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()