Koregaon APMC Result : आमदार शशिकांत शिंदेंचा १८ पैकी १६ जागांवर विजय; महेश शिंदेंचा दारुण पराभव

आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी सहकार विकास पॅनलने १८ पैकी १६ जागा मोठ्या मताधिक्याने जिंकल्या.
korgav apmc election result
korgav apmc election resultsakal
Updated on
Summary

आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी सहकार विकास पॅनलने १८ पैकी १६ जागा मोठ्या मताधिक्याने जिंकल्या.

कोरेगाव - तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी सहकार विकास पॅनलने १८ पैकी १६ जागा मोठ्या मताधिक्याने जिंकत बाजार समितीवरील आपली सत्ता कायम ठेवतानाच आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कोरेगाव तालुका शेतकरी विकास आघाडी पॅनेलचा दारुण पराभव केला. त्यांना केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले.

कोरेगाव बाजार समितीच्या निवडणुकीसाठी काल ९५ टक्के मतदान झाले होते. आज सकाळी दहा वाजता कोरेगाव बाजार समितीच्या आवारातील गीताई मंगल कार्यालयात मतमोजणी होऊन दुपारपर्यंत सर्व निकाल जाहीर करण्यात आले. प्रारंभी हमाल व मापाडी मतदारसंघातील एका जागेची मतमोजणी झाली. त्यात प्रथम स्वतंत्र उमेदवार म्हणून उभ्या राहीलेल्या परंतु, नंतर आमदार महेश शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची छायाचित्रे वापरून प्रचार पत्रक काढून प्रचार केलेले संजय गोरख बर्गे यांनी आपले प्रतिस्पर्धी स्वतंत्र उमदेवार दत्तात्रय विश्वनाथ गाडे यांच्यावर केवळ दोन मतांनी विजय मिळवला. त्यांना ५५, तर श्री. गाडे यांना ५३ मते मिळाली. त्यानंतर व्यापारी आणि अडते मतदारसंघातील दोन जागांवर "शेतकरी सहकार"चे राहुल सुधाकर बर्गे (३०६) व "शेतकरी विकास"चे सुनील ज्योतिर्लिंग निदान (२९५) हे विजयी झाले.

सहकारी सेवा सोसायटी मतदार संघातील सात जागांवर "शेतकरी सहकार"चे ॲड. पांडुरंग चंद्रकांत भोसले (५९२), कल्याण किसन भोसले (५८९), जयवंत साहेबराव घोरपडे (५८७), राहुल शिवाजी निकम (५८७), दिलीप शामराव अहिरेकर (५७१), प्रमोद लक्ष्मण धुमाळ (५७०) व अधिक दत्तात्रय माने (५५७) हे विजयी झाले. महिला राखीव मतदारसंघातूनही "शेतकरी सहकार"च्याच वैशाली हणमंतराव भोसले (५९९) व साधना संजय चव्हाण (५९२) या विजयी झाल्या. इतर मागास प्रवर्ग राखीव मतदारसंघातूनही 'शेतकरी सहकार"चे ॲड. अमोल रत्नाकर राशिनकर (६१६), विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघातूनही "शेतकरी सहकार"चे केशव बाळकृष्ण मदने (६२१) विजयी झाले.

ग्रामपंचायत मतदारसंघातील सर्वसाधारण दोन जागांवर "शेतकरी सहकार"चे बापूसाहेब पांडुरंग चव्हाण (६७१) व विशाल विष्णू शिंगटे (५९९), आर्थिकदृष्ट्या दुर्बल मतदारसंघातून आनंद विठ्ठल जाधव (६१९) व अनुसूचित जाती जमाती राखीव मतदारसंघातून गोविंद चंद्रकांत कदम (६४९) हे विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कोरेगावच्या सहायक निबंधक प्रीती काळे यांनी काम पाहिले.

राष्ट्रवादीच्या एकजूटीचा विजय

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने लागलेल्या बाजार समिती निवडणुकीच्या निकालावरुन यावेळी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात नव्हे तर संपूर्ण कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेते, कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केल्याचे दिसून येत असल्याची प्रतिक्रिया सामान्य कार्यकर्ते व्यक्त करताना दिसत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.