सातारारोड : पाण्याचे राजकारण करून लोकांची दिशाभूल करणाऱ्या विरोधकांचे पितळ उघडे पडले असल्याने आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आता क्रांतीची तुतारी हाती घेतलेली कोरेगाव मतदारसंघातील जनता या निवडणुकीत विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे, असा घणाघात महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी केला.
कुमठे (ता. कोरेगाव) येथे आमदार शशिकांत शिंदे यांच्या निवडणूक प्रचारार्थ रॅली काढण्यात आली. त्यानंतर झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.
आमदार शिंदे म्हणाले, ‘‘कुमठे गावातील युवक, महिला, ग्रामस्थांनी प्रचार रॅलीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. जनतेने केलेला हा उठाव पाहिल्यानंतर हतबल झालेल्या विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सामान्यांना त्रास देण्याची त्यांची कृत्ये सुरूच आहेत. आता कहर म्हणजे ७० वर्षे वयाच्या वृद्धावर तडीपारीची कारवाई केली जात आहे.
कुमठ्याचा स्वाभिमान दुखावला, तर काय होते, हे मतदानातून दिसणार आहे. वसना-वांगणा, जिहे-कटापूर योजना मी जलसंपदामंत्री असताना झाल्या आहेत. या भागात आम्ही पाण्यासाठी बंधारे बांधले; पण कधी पाण्याचे राजकारण केले नाही; परंतु विरोधक केवळ मतांसाठी पाण्याचे राजकारण करून लोकांची फसवणूक करत आहेत. सत्तेचा उपयोग लोकांना गुलाम बनविण्यासाठी करणाऱ्या विरोधकांचा पाडाव करण्यासाठी मतदार सज्ज झाले आहेत.’’
पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ जगदाळे म्हणाले, ‘‘ट्रिमिक्स काँक्रिटीकरणाच्या नावाखाली स्वतःच्या कंपन्या चालवून खिसे भरणाऱ्या विरोधकांच्या दबावाच्या व खालच्या पातळीवरील राजकारणापुढे कुमठ्याचे मतदार झुकणार नाहीत. विरोधकांनी गावाचे ३५ एकर वनीकरण भाडेतत्त्वावर दिले आहे. त्यांचा सहभाग असलेल्या सोलर कंपनीसाठीचे ३५ एकर व राहिलेले ९० एकर वनीकरण घेण्यासाठी. मतदारांनी या निवडणुकीत हुकूमशाही प्रवृत्तीला घरी पाठविण्याचा विडा उचलला आहे.’’
राजकीय द्वेषापोटी रामोशीवाडीतील पाण्याचा व्हॉल्व्ह बंद करणारे विरोधक स्वतःला जलनायक म्हणवतात, याच्यासारखे दुसरे दुर्दैव नाही, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे दिनेश बर्गे यांनी केली. संजना जगदाळे, राजवीर जगदाळे यांचीही भाषणे झाली.
धोमच्या पाण्याबाबत दिशाभूल
राजाभाऊ जगदाळे म्हणाले, ‘‘धोमच्या कालव्यातून ३६५ दिवसांपैकी ३०० दिवस पाणी देणार असल्याचे सांगत विरोधक लोकांची दिशाभूल करत आहेत. मात्र, त्यासाठी धरणामध्ये १८ टीएमसी पाणी असणे आवश्यक आहे. धोमच्या उजव्या, डाव्या कालव्यांची मर्यादा ७५० क्युसेक आहे. धोम धरण १३ टीएमसीचे आहे. त्यातील ११.६९ टीएमसी पाणी सिंचनासाठी आहे. राज्य शासनाच्या १५ आॅक्टोबर २०२४ च्या आदेशात ७.५८ टीएमसी पाणी दिले आहे. मग ३०० दिवस कालव्यातून पाणी कसे चालेल? जिहे-कटापूर योजना जून ते १४ ऑक्टोबर अशी असताना आणि या योजनेला ३.१७ टीएमसी पाणी मंजूर असताना ही योजना बारमाही कशी चालविणार? या प्रश्नाचे तसेच यासंदर्भातील राज्य शासनाचा ३० ऑगस्ट २०१९ चा अध्यादेश खोटा आहे का? याचेही उत्तर विरोधकांनी द्यावे.’’
#ElectionWithSakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.