'शिवसेनेच्या आमदारावर टीका केल्यास राष्ट्रवादीला जशास तसं उत्तर देऊ'

Nationalist Congress Party
Nationalist Congress Partyesakal
Updated on

कोरेगाव (सातारा) : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून (Nationalist Congress Party) खालच्या पातळीवरील एकेरी टीका झाल्याने केवळ कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आमदार महेश शिंदे (MLA Mahesh Shinde) यांनी टीकेला उत्तर दिले. राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी संयम बाळगला असता, तर त्यांना उत्तर देण्याची वेळ आली नसती. यापुढे आमदार महेश शिंदे यांच्यावर टीका केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्र. बर्गे, कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, कुमठेचे माजी उपसरपंच सुधीर जगदाळे, हणमंतराव जगदाळे, सुनील वाघ, रमेश माने, संभाजी चव्हाण यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

Summary

आमदार होण्यापूर्वीपासून महेश शिंदे यांनी जनसेवेसाठी स्वत:ला वाहून घेतले आहे.

आमदार महेश शिंदे यांच्यावरील टीकेचा प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पत्रकात निषेध केला आहे. राहुल प्र. बर्गे म्हणाले, ‘‘आमदार होण्यापूर्वीपासून महेश शिंदे यांनी जनसेवेसाठी स्वत:ला वाहून घेतले आहे. त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून चांगले काम केले आहे. कोरोना काळातील त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे, हीच त्यांच्या कामाची पोचपावती आहे. आमदार महेश शिंदे यांनी स्वत: कोणतीही टीका सुरवातीला केली नव्हती. ते विकासकामांबाबत बोलत असत.’’

Nationalist Congress Party
भाजप खासदार उदयनराजे शिवसेनेच्या दिग्गज नेत्याच्या भेटीला

राजाभाऊ बर्गे म्हणाले, ‘‘कोरोना काळात आमदार महेश शिंदे यांच्यासह त्यांच्या भगिनी डॉ. अरुणा बर्गे, पत्नी डॉ. प्रिया शिंदे यांच्यासह काडसिद्धेश्वर कोविड टास्क फोर्सने केलेल्या कामाची महाराष्ट्रात प्रशंसा होत आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांवर तातडीने मोफत उपचार केले आहेत. घरापासून कोविड हॉस्पिटलपर्यंत नेण्याची आणि परत घरी आणून सोडण्याची मोफत सोय केली होती, हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लोक विसरलेले दिसतात. आपण स्वत: काही करायचे नाही आणि आमदार महेश शिंदे यांनी केले, तर त्यांना त्रास का होत आहे, हेच समजत नाही.’’ हणमंतराव जगदाळे, सुधीर जगदाळे, रमेश माने यांनीही आमदार महेश शिंदे यांच्या कामाचे कौतुक केल्याचे पत्रकात नमूद केले आहे.

Nationalist Congress Party
उदयनराजेंच्या भेटीनंतर भिडे गुरुजी सेना नेत्याच्या भेटीला

कुमठेतील रुग्णांवर चांगले उपचार

काडसिद्धेश्वर कोविड हॉस्पिटलमध्ये कुमठे येथील ९३ कोरोनाग्रस्तांवर चांगल्या पद्धतीने मोफत उपचार, त्यांच्या खाण्यापिण्याची मोफत व्यवस्था केली होती. विजय जगदाळे या कार्यकर्त्याने स्वखर्चाने कोरोनाग्रस्त रुग्णांची व त्यांच्या नातेवाइकांच्या मोफत प्रवासाची व्यवस्था स्वत:च्या वाहनातून केली होती, असा दावा करत टीका करणाऱ्यांनी गावासाठी काय केले, हे त्यांनाच विचारा, असे आव्हान कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी दिल्याचे या पत्रकात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.