सातारा : कोयना धरणग्रस्तांचे २१ मार्चपासून आंदोलन : डॉ. पाटणकर

गेल्या ६४ वर्षांपासून कोयना धरणग्रस्तांचे पुनर्वसन रखडले
Koyna dam agitation from 21st March Dr Patankar satara
Koyna dam agitation from 21st March Dr Patankar satarasakal
Updated on

सातारा : कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. मात्र, अद्यापही प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष केल्याने श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने २१ मार्चला कोयना प्रकल्पग्रस्त बेमुदत आंदोलन करणार असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांची निवेदनाद्वारे सांगितले आहे. गेल्या ६४ वर्षांपासून कोयना धरणग्रस्तांचे पुनर्वसन रखडले आहे. मागील चार वर्ष धरणग्रस्तांचे व त्यातून निर्माण झालेल्या कोयना अभयारण्यग्रस्तांची आंदोलने अनेक ठिकाणी झाली.

या गंभीर प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठकही झाली. त्यानंतरही कोणती कार्यवाही न झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत चर्चा झाली, तरीदेखील आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे हजारो प्रकल्पग्रस्त अस्वस्थ झाले असून, त्यांना न्याय देण्यासाठी पुन्हा रस्त्यावर उतरणार आहे. राज्याच्या विविध भागांत विखुरलेले व प्रामुख्याने सात जिल्ह्यांतील हजारो प्रकल्पग्रस्त बेमुदत आंदोलन करणार आहेत. प्रत्यक्षात जमीन वाटप व आराखडा सुरू होत नाही तोपर्यंत माघार न घेण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.