सलग दुस-या दिवशी कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरुच

सलग दुस-या दिवशी कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरुच
Updated on

सातारा : कोयना पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. आज (गुरुवार) सकाळी आठ वाजता जलाशयात आठ हजार 005 क्युसेक प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरू हाेती. या धरणाची १०५.२५ टीएमसी इतकी पाणीसाठवण क्षमता असून धरण भरल्याने बुधवारपासूनच सहा वक्री दरवाजे उघडण्यात आले आहेत. आज सलग दूस-या दिवशी धरणातून पाणी साेडण्यात आले आहे. एकूण दहा हजार 261 क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला असल्याची माहिती धरण व्यवस्थापनकडून देण्यात आली.

कोयना धरण सद्यस्थितीत पूर्ण क्षमतेने भरले असून धरणात १०५.२५ टीएमसी एवढा पाणी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे बुधवारी सकाळपासून धरणाचे दरवाजे एका फुटाने उघडून व पायथा वीजगृहातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र दिवसभरात जलाशयात येणाऱ्या पाण्याची आवक वाढतच गेल्याने धरणाचे सर्व दरवाजे पाऊण फुटाने उचलून पाण्याचा विसर्ग करण्यात येत हाेता.

काेविडच्या लढ्यासाठी शाहूपुरीतील सेवानिवृत्त शिक्षिकेचे पन्नास हजारांचे याेगदान

सध्या आज (गुरुवार) सकाळी आठ वाजता धरणात आठ हजार 005 क्युसेक प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरू आहे.  त्यामुळे कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला. त्यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, पावसाचे कमी-जास्त प्रमाण पाहता धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीपात्रात कोणीही जावू नये, असा इशाराही प्रशासनाने यापुर्वीच दिला आहे.

आम्ही करून दाखवलं; मराठा आरक्षणाबाबत फडणवीसांनीच केला थातूर मातूरपणा : पृथ्वीराज चव्हाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.