कोयनेतील पाण्याचा वाद पेटणार; सातारा-सांगली लोकप्रतिनिधींमध्ये खडाजंगी, मंत्री देसाईंना केलं जातंय 'टार्गेट'

कोयना धरणातील पाण्यावरून यापुढील काळात दोन्ही जिल्ह्यांतील नेत्यांमध्ये खटके उडण्याची चिन्हे आहेत.
Koyna Dam Water Dispute Shambhuraj Desai vs Sanjay Patil
Koyna Dam Water Dispute Shambhuraj Desai vs Sanjay Patil esakal
Updated on
Summary

साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्‍या नावे कोयनेचा सातबारा नसून पाण्यासाठी सांगली जिल्ह्यास वेठीस धरणाऱ्या प्रवृत्तीचा आपण निषेध करतो. - संजयकाका पाटील, खासदार, सांगली

कऱ्हाड : यंदा पर्जन्यमान कमी झाल्यामुळे आता हिवाळ्यातच दुष्काळाचे चटके बसत आहेत. कोयना धरणात पाणीसाठा कमी असल्यामुळे बारमाही हरित असलेल्या कृष्णा-कोयना काठालाही टंचाईची झळ बसू लागली आहे. कोयना धरणातून (Koyna Dam) सिंचनासाठी पाणी सोडण्यावरून सातारा व सांगली जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधींमध्ये खडाजंगी सुरू आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यावर हक्क सांगत ते मिळवण्याचा प्रयत्न सांगली जिल्ह्यातील राजकीय नेते करत आहेत. त्यासाठी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना टार्गेट केले जात आहे.

Koyna Dam Water Dispute Shambhuraj Desai vs Sanjay Patil
'उदयनमहाराज, ही रणजीची टीम नाही तर IPL टीमचे तुम्हीच मालक आहात'; असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस?

खासदार संजयकाका पाटील (SanjayKaka Patil) यांनी, तर कोयनेच्या पाण्यासाठी खासदारकी पणाला लावण्याचा इशारा दिला आहे. सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे (Suresh Khade) यांनीही पाण्यासाठी साताऱ्याच्या पालकमंत्र्यांना टार्गेट केले, तर आमदार लाड यांनी मोर्चा काढून प्रशासनाला इशारा दिला. मात्र, साताऱ्याचे पालकमंत्री देसाई यांनी सावध पवित्रा घेतला आहे. कोयना धरणातील पाण्यावरून यापुढील काळात दोन्ही जिल्ह्यांतील नेत्यांमध्ये खटके उडण्याची चिन्हे आहेत.

कोयना धरणाची स्थिती अशी

कोयना धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी इतकी आहे. मात्र, यावर्षी पावसाळी हंगामापूर्वी १ जून रोजी धरणात १७.६४ टीएमसी पाणीसाठा होता, तर यंदा मागील वर्षीच्या तुलनेत पर्जन्यमानात ४४० मिलिमीटरची तूट आणि आवाकमध्येही ३९.७१ टीएमसी इतकी घट झाली. त्यातच १ जून ते १४ ऑक्टोबर या कालावधीत सिंचनासाठी ५.४६ आणि वीजनिर्मितीसाठी २३.०३ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. धरणामधून सिंचनासाठी ४२.७० टीएमसी वार्षिक पाणी वापराचे प्रकल्पीय नियोजन असते. रब्बी व उन्हाळी हंगामामधील सिंचन व वीजनिर्मितीसाठी एकूण ७० टीएमसी इतका मर्यादेत पाणीवापर करण्याबाबत सूचना आहे.

Koyna Dam Water Dispute Shambhuraj Desai vs Sanjay Patil
Sangli Politics : होमग्राऊंडवरच जयंत पाटलांना भाजप नेत्यांचा 'दे धक्का'; राजकीय तर्क-वितर्कांना उधाण

पावसाअभावी ११.७१ टीएमसीची कपात प्रस्तावित

यावर्षी कमी पर्जन्यमान झाल्याने कोयना धरण भरले नाही. त्यामुळे सिंचन आणि वीजनिर्मितीच्या नियोजित पाणी वापरात ११.७१ टीएमसी कपात प्रस्तावित करण्यात आलेली आहे. यामध्ये सिंचनासाठीच्या पाण्याची २.८६ आणि वीज निर्मितीसाठीच्या पाण्याची ८.८५ टीएमसी पाणी कपात प्रस्तावित करण्यात आली आहे.

धरणातील पाण्याची विभागणी अशी

कोयना धरणात ८९ टीएमसी पाणी आहे. त्या पाण्यापैकी ३५ टीएमसी पाणी सिंचनासाठी ठेवले आहे. पैकी तीन टीएमसी पाणी सातारा जिल्ह्यातील योजनांसाठी आहे, तर ३२ टीएमसी पाणी सांगलीसाठी आहे. त्यात प्राधान्याने टेंभू, ताकारी योजनांसह खासगी उपसा सिंचन योजनांचा समावेश आहे. सांगलीला ३२ टीएमसी हक्काचे पाणी देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

Koyna Dam Water Dispute Shambhuraj Desai vs Sanjay Patil
आनेवाडी टोलनाका वाद : आमदार शिवेंद्रराजेंसह 48 जणांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता, काय घडलं होतं 'कोजागरी'च्या रात्री?

मुख्यमंत्री, जलसंपदामंत्र्यांच्या कोर्टात वाद

सातारा व सांगली या दोन्ही जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधींमधील पाण्यावरून कलगीतुरा सुरू आहे. त्यासाठी विधानसभेच्या अधिवेशनात आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार लाड यांनी आवाज उठवून कोयनेच्या पाण्याची विचारणा केली होती. सांगलीचे खासदार पाटील आणि पालकमंत्री खाडे यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्या पाण्याचा वाद आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेला आहे.

सांगली शहरासह सर्व शहरांसाठी पिण्याचा पाणीपुरवठा करण्यामध्ये कोणतीही अडचण नाही. याबाबत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आहे. त्यामुळे कोयना धरणातून विसर्ग थांबणार नाही. आवश्यकता भासेल त्याप्रमाणे पुरेसे पाणी सोडण्यात येईल.

-शंभूराज देसाई, पालकमंत्री, सातारा

Koyna Dam Water Dispute Shambhuraj Desai vs Sanjay Patil
'आम्ही राजू शेट्टींच्या मागे पळणार नाही, त्यांना गरज वाटली तर ते आमच्याकडे येतील'; 'इंडिया आघाडी'चा स्पष्ट इशारा

सांगलीसह कृष्णाकाठच्या गावांसाठी हक्काचे पाणी सोडण्यास विलंब करणाऱ्या साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्‍या नावे कोयनेचा सातबारा नसून पाण्यासाठी सांगली जिल्ह्यास वेठीस धरणाऱ्या प्रवृत्तीचा आपण निषेध करतो.

-संजयकाका पाटील, खासदार, सांगली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.