Krishna Factory Election : कऱ्हाड शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

Krishna factory
Krishna factoryesakal
Updated on

सातारा : कृष्णा कारखाना निवडणुकीच्या (Krishna factory election) अनुषंगाने कऱ्हाड तालुक्यातील मतदान केंद्रांतील (Polling station) मतदानाची मतमोजणी 1 जुलै 2021 रोजी कऱ्हाड शहरातील रत्नागिरी गोडावून इमारत (ता. कराड, जि. सातारा) या ठिकाणी पार पडणार आहे. या परिसरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल (Superintendent of Police Ajay Kumar Bansal) यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 34 अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारानुसार, 1 जुलै रोजी सकाळी 7.00 वाजल्यापासून ते मतमोजणी प्रक्रिया पार पडेपर्यंत खालीलप्रमाणे वाहतुकीच्या मार्गात बदल केला आहे. (Krishna Factory Election Changes In The Transportation System In The City Of Karad Satara Political News)

Summary

कृष्णा कारखाना निवडणुकीच्या अनुषंगाने उद्या 1 जुलै रोजी कऱ्हाडातील रत्नागिरी गोडावून इमारतीत मतमोजणी पार पडणार आहे.

वाहतूक मार्गातील तात्पुरता बदल : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ–कार्वे नाका ते भेदाचौक जाणारा रोड, एस.टी. बस व अवजड वाहतुकीसाठी चालू ठेवण्यात येणार असून दुचाकी वाहने, चारचाकी, रिक्षा या लहान वाहनाकरिता सदरचा मार्ग बंद राहील.

पर्यायी वाहतूक व्यवस्था : कार्वे नाका मार्गे कराड शहरात येणारे मोटार सायकल व सर्व प्रकारच्या वाहनांकरिता कार्वे नाका ते मुजावर कॉलनी येथून इदगाह मैदान मार्गे कामगार चौक मार्गे जातील.

Krishna factory
'कृष्णा'साठी 91 टक्के चुरशीने मतदान; गुरुवारी होणार मतमोजणी

वाहन पार्किंग व्यवस्था : कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक मतमोजणीच्या अनुषंगाने येणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची वाहने जुने तहसील कार्यालय मैदानात पार्किंग व्यवस्था करण्यात आलीय. कृष्णा कारखाना निवडणूक मतमोजणीच्या अनुषंगाने येणाऱ्या नागरिकांच्या वाहनाकरिता वरद मेडिकल समोरील मैदानात पार्किंग व्यवस्था करण्यात आलीय. तरी या बदलाची सर्व नागरिकांनी नोंद घेवून पोलीस दलास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक बन्सल यांनी केले आहे.

Krishna Factory Election Changes In The Transportation System In The City Of Karad Satara Political News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.