इस्लामपूर : मी अध्यक्ष असताना कारखान्यावर (Krishna Sugar Factory Election) सात प्रकल्प उभे करून इतर कारखान्यांपेक्षा काकणभर जादा दर दिला. २०१० नंतर शिल्लक राहिलेल्या नफ्यावर पहिले दोन वर्षे दर काढता आला. तर विद्यमान संचालक मंडळाने सहा वर्षांत आठ ते नऊ बिले चुकवली. असे असताना सत्ताधारी सर्व गोष्टीत विक्रम व उच्चांक केल्याचा डांगोरा पिटत आहेत. मग त्यांना यावर्षीची एफआरपी देताना अडचण का आली आहे, याचा अर्थ सर्व उच्चांकी मग ऊसदर देण्यास कारखान्याला काय कोरोना झाला आहे का? असा सवाल डॉ. इंद्रजित मोहिते (Dr. Indrajit Mohite) यांनी उपस्थित केला. (Krishna Factory Election Indrajit Mohite Criticizes The Opposition In Borgaon Satara Marathi News)
मी अध्यक्ष असताना कारखान्यावर सात प्रकल्प उभे करून इतर कारखान्यांपेक्षा काकणभर जादा दर दिला असल्याचे डॉ. इंद्रजित मोहिते यांनी सांगितले.
बोरगाव (ता. वाळवा) येथे यशवंतराव मोहिते रयत पॅनेलच्या (Yashwantrao Mohite Rayat Panel) प्रचारार्थ डॉ. मोहिते यांनी रेठरे हरणाक्ष-बोरगाव गटातील उमेदवार विश्वासराव मोरे, विवेकानंद मोरे, प्रा. अनिल पाटील, बोरगावचे माजी उपसरपंच विकास पाटील, विलास शिंदे, विश्वास पाटील व पदाधिकारी यांच्यासमवेत पदयात्रा काढली. यावेळी ते बोलत होते. डॉ. मोहिते म्हणाले, ‘‘कारखाना व्यवस्थापन ज्या ज्या वेळेस यशवंतराव मोहिते भाऊंच्या विचाराने चालले, त्या त्या वेळी सभासदांना सन्मानाची वागणूक व जास्तीत जास्त दर मिळाला.
मी अध्यक्ष असताना भाऊंच्या विचारामुळे सुवर्ण दिवस पाहायला मिळाले. आमच्या कारभारात सात प्रकल्प उभे राहिले. सभासदांना दर जादा मिळाला. पण, गेल्या ११ वर्षांत सभासदांना ऊस बिले किती मिळाली, हे तपासून पाहा. मी पाच वर्षांत २४ बिले दिली. सभासदांनी मागील बिले काढून तपासावीत व ऊसदराचा खरा इतिहास जाणून घ्यावा. पण, अविनाश मोहिते व सुरेश भोसले यांनी नऊ ते दहा बिले चुकवली व इतर कारखान्यांपेक्षा दरही कमी दिला आहे.’’
Krishna Factory Election Indrajit Mohite Criticizes The Opposition In Borgaon Satara Marathi News
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.