कोयनानगर (सातारा) : मुसळधार पावसाने (Heavy Rain) रौद्ररूप धारण केल्यामुळे कोयना विभागावर आपत्तीचा डोंगर (Koynanagar Landslide) कोसळला. मिरगाव, बाजे, गोकुळनाला, हुंबरळी या गावांवर अस्मानी संकट कोसळले आहे. तिन्ही गावांतील लोकांना कोयनानगर येथील नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल (Netaji Subhashchandra High School) येथे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे. मात्र, या हायस्कूललाच भूस्खलनाचा फटका बसला आहे. हायस्कूलच्या कार्यालयाच्या मागे २५ ते ३० फूट मोठे भगदाड पडले आहे. बाधित गावांतील जनतेच्या मागे लागलेल्या संकटांच्या समस्या पाठ सोडत नसल्याचे या घटनेवरून अधोरेखित झाले आहे.
मुसळधार पावसाने रौद्ररूप धारण केल्यामुळे कोयना विभागावर आपत्तीचा डोंगर कोसळला आहे.
कोयना विभागात २२ जुलैला झालेल्या धुवाधार पावसाने विभागात अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने अनेक गावांना धोका निर्माण झाला आहे. मिरगाववर तर आपत्तीचा डोंगर आला आहे. या गावातील ११ तर ढोकावळे येथे चार लोक ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. विभागातील हुंबरळी येथे मुसळधार पावसात एक घर पडून एका महिलेचा मृत्यू झाला. बाजे, गोकुळनाला या गावावर दरडी कोसळत असल्याने ही गावे भीतीच्या छायेत आहेत. मिरगाव या गावातील सर्व ग्रामस्थांचे कोयनानगर येथील मराठी शाळेत स्थलांतर केले आहे.
ढोकावळे येथील कुटुंबांना चाफेर-मिरगाव येथील हायस्कूलमध्ये, हुंबरळी येथील बाधित कुटुंबे एमटीडीसीमध्ये, तर बाजे व गोकुळनाला येथील बाधित कुटुंबे नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल येथे स्थलांतरित केली आहेत. या हायस्कूलच्या कार्यालयामागे २५ ते ३० फूट खोल मोठे भूस्खलन होऊन या इमारतीला धोका निर्माण झाला आहे. यामुळे शाळा प्रशासन पुन्हा एकदा चिंतेत पडले आहे. बाधित कुटुंबांची पाळीव, मुकी जनावरे गावातच आहेत. मुक्या जनावरांच्या ओढीने स्थलांतरित केलेले लोक आमचे तातडीने पुनर्वसन करा, अशी मागणी करत असून आपल्या घरी जाऊन या मुक्या जनावरांना चारा घालून पुन्हा छावणीत येत आहेत.
कोयनेतील नेताजी सुभाषचंद्र विद्यालयाच्या कार्यालयामागे मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे शाळेच्या इमारतीला धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने याची नोंद घेऊन योग्य ती कार्यवाही करावी.
-एम. जे. गिरीगोसावी, मुख्याध्यापक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.