सातारा : माझी वसुंधरा अभियानास २१ पर्यंत अंतरिम मुदत

जिल्ह्यातील १३५० ग्रामपंचायतींचा सहभाग
माझी वसुंधरा
माझी वसुंधरा sakal
Updated on

सातारा : ‘माझी वसुंधरा’ अभियानात केलेल्या कामांची माहिती भरण्यासाठी ग्रामपंचायतींना २१ जानेवारीपर्यंत अंतरिम मुदत देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या(satara jilha parishad) ग्रामपंचायत विभागाने दिली आहे. दरम्यान, या अभियानात जिल्ह्यातील एक हजार ३५० ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला आहे.

माझी वसुंधरा
कऱ्हाडला थकबाकीदार झळकणार फ्लेक्सवर!

माझी वसुंधरा अभियान संचालनालय, पर्यावरण(environment) व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत भूमी, अग्नी, जल, वायू, आकाश या पंचतत्त्‍वावर आधारित माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते जागतिक पर्यावरणदिनी करण्यात आली आहे. या अभियानामध्ये २०११ च्या जनगणनेनुसार दहा हजार किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व ग्रामपंचायती व दहा हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती अशा दोन वर्गवारीमध्ये ग्रामपंचायतींचा सहभाग घेऊन निवड करण्यात येणार आहे. एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत करण्यात येणाऱ्या कामाचे मूल्यमापन करण्यात येणार आहे.

माझी वसुंधरा
सातारा :मेडिकल कॉलेजचे टेंडर महिनाअखेरास

दरम्यान, या अभियानात हेरिटेज ट्रीगणना, वृक्षगणना, रोपवाटिकेची निर्मिती, जैव-विविधता रजिस्टर, वृक्ष आराखडा, एकल वापर प्लॅस्टिक बंदी, घनकचरा व्यवस्थापन, जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन, ई-कचरा व्यवस्थापन, फटाक्यांवर बंदी घालण्याच्या दिशेने पुढाकार, कृषी कचरा व्यवस्थापन (ग्रामीण), उज्ज्वला योजना आणि गॅस जोडणी (ग्रामीण), सायकलिंगकरिता वाट/मार्गनिर्मिती, इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२१ ची प्रभावी अंमलबजावणी, रेस टू झिरो, पाण्याचे लेखापरीक्षण अहवाल, सार्वजनिक इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग, विहीर पुनर्स्थापना उपक्रम ही या अभियानाची प्रमुख्य वैशिष्ट्ये आहेत. या घटकांसह इतर निकषांवर आधारित ग्रामपंचायतींनी केलेल्या कामाची अंतरिम माहिती माझी वसुंधरा वेबपोर्टलवर ऑनलाइन एमआयएसमध्ये भरण्यासाठी शासनाने मुदतवाढ दिली आहे. ही माहिती सात ते २१ जानेवारी या कालावधीत भरण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.