Jiva Mahale : शिवरायांचे अंगरक्षक जिवा महालेंच्या वंशजाला मिसेस मुख्यमंत्र्यांची लाखमोलाची मदत

शिवरायांनी आपल्या अनेक वीर व निडर मावळ्यांच्या मदतीनं प्रचंड मोठं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं.
Jiva Mahale descendants Pratiksha Mahale
Jiva Mahale descendants Pratiksha Mahaleesakal
Updated on
Summary

जिवा महालांच्या वंशजांच्या 14 व्या पिढीतले प्रकाश महाले हे पक्षाघाताच्या व्याधीनं गेल्या काही वर्षांपासून अंथरुणाला खिळून आहेत.

सातारा : शिवरायांनी आपल्या अनेक वीर व निडर मावळ्यांच्या मदतीनं प्रचंड मोठं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. परंतु, स्वराज्य निर्माण करताना अनेक मौल्यवान रत्न गमवावे लागले. अशा वीर मर्द मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं.

यातच एक महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवरायांचे अंगरक्षक जिवाजी महाले यांची आहे. जिवाजी महाले हे एक वीर लढवय्ये होतेच, या व्यतिरिक्त ते छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षकही होते, "होता जिवा म्हणून वाचला शिवा" ही म्हण यांच्या वरूनच आहे.

Jiva Mahale descendants Pratiksha Mahale
Nana Patole : मुख्यमंत्री शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरतील; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा

दरम्यान, याच जिवाजी महालांच्या वंशजा प्रतीक्षा महाले यांच्याबाबत महत्वाची बातमी समोर येत आहे. जिवा महालांचे वंशज महाबळेश्वरमधील कोंढवली गावी राहात आहेत. प्रतिकूल परिस्थितीशी सामना करणाऱ्या या वंशाजांच्या 15 व्या पिढीतील प्रतीक्षा प्रकाश महाले हिच्या विवाहासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या पुढाकारानं मदतीचा आश्वासक हात देण्यात आला.

Jiva Mahale descendants Pratiksha Mahale
Police Exam Case : भरती परीक्षेत कॉपी करणारे परीक्षार्थी पोलिसांच्या जाळ्यात; ब्ल्यू टूथचा केला होता वापर

लताताई शिंदे यांच्या सूचनेनुसार, प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी लिहिलेल्या ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या चरित्रग्रंथाच्या पूर्वनोंदणी विक्रीतून जमा झालेल्या रकमेचा धनादेश मंगळवारी वाईत महाले कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला. जिवा महालांच्या वंशजांच्या 14 व्या पिढीतले प्रकाश महाले हे पक्षाघाताच्या व्याधीनं गेल्या काही वर्षांपासून अंथरुणाला खिळून आहेत.

Jiva Mahale descendants Pratiksha Mahale
Summer Holiday : चाकरमान्यांसाठी मोठा दिलासा; उन्हाळी सुट्यांसाठी तब्बल 942 स्पेशल गाड्या

त्यामुळं त्यांच्या पत्नी जयश्री महाले या शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. प्रतीक आणि प्रतीक्षा या दोन अपत्यांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जयश्री महाले यांनी वाढवलं, मोठं केलं. येत्या 12 मे रोजी प्रतीक्षा महाले हिचा विवाह ठरला आहे. ही माहिती मिळताच मुख्यमंत्री शिंदेंच्या पत्नी लताताई शिंदे या महाले कुटुंबीयांच्या मदतीसाठी पुढं सरसावल्या आणि त्यांच्या सुचनेनुसार, साहित्यिक प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी लिहिलेल्या ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या आगामी चरित्रग्रंथाच्या पूर्वनोंदणी विक्रीतून जमा झालेल्या रकमेचा धनादेश वाईत प्रा. डॉ. ढवळ यांच्या हस्ते महाले कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.