सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्‍हा बँकेचा गौरव

केंद्र सरकारच्‍या सहकार मंत्रालय आणि एनएएफएससीओबीच्‍यावतीने गौरव
satara District Bank recovery cash credit Farmers in trouble satara
satara District Bank recovery cash credit Farmers in trouble satarasakal
Updated on

सातारा - केंद्र सरकारच्‍या सहकार मंत्रालय आणि एनएएफएससीओबीच्‍यावतीने नवी दिल्ली येथे ता. १२ रोजी झालेल्‍या विज्ञान भवनातील राष्ट्रीय परिषदेमध्ये सातारा जिल्हा बँकेचा एका दशकातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा यांनी गौरव केला. बॅंकेच्‍यावतीने हा गौरव अध्‍यक्ष नितीन पाटील यांनी स्‍वीकारला. या वेळी बँकेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश सरकाळे, तसेच सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा, भारतीय रिझर्व्ह बँक आणि नाबार्डचे प्रतिनिधी, तसेच इतर मान्यवर उपस्‍थित होते.

जिल्‍हा बँकेचा गौरव केल्‍यानंतर ग्रामीण भागातील प्रत्येक वंचित व्यक्तीसाठी विकासाच्या सुलभतेचे आव्हान पेलत सहकार मंत्रालय काम करत आहे. विविध कार्यकारी विकास सेवा संस्थांचे संगणकीकरण करणेसाठी अर्थसाहाय्य आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे सर्वच प्रश्न सोडविण्‍यास प्राधान्‍य देणार असल्‍याचे या वेळी अमित शहा यांनी सांगितले. परिषदेत नितीन पाटील यांनी सहकारी बँकांना भेडसावणाऱ्या समस्‍या व विविध अडचणी मांडल्‍या.

सहकार मंत्रालयाने देशातील ३५१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची गेल्या दहा वर्षांतील कामकाजाची माहिती घेऊन सातारा जिल्हा बँकेची निवड करत सन्मानित केले आहे. पुरस्काराबद्दल बँकेचे ज्येष्ठ संचालक रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार बाळासाहेब पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील आणि सर्व संचालक सदस्य यांनी बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.