कऱ्हाड पुन्हा हादरलं! महिनाभरात तब्बल नऊ जणांचा खून

Karad Police
Karad Policeesakal
Updated on
Summary

भरवस्तीत होणाऱ्या खुनांच्या घटनांनी पोलिसही (Karad Police) हादरले आहेत.

कऱ्हाड (सातारा) : भरवस्तीत होणाऱ्या खुनांच्या घटनांनी पोलिसही (Karad Police) हादरले आहेत. व्यक्‍तिगत कारणाने होणाऱ्या खुनांच्या घटनांत महिनाभरात तब्बल नऊ जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यात तीन लहान मुलांचा हकनाक जीव गेला आहे. खून, तो करतानाची क्रूरता व त्यामागच्या क्षुल्लक कारणाने पोलिसही चक्रावले आहेत. कायदा व सुव्यवस्था सुरळीत आहे, असा पोलिस करत असलेला कागदोपत्री दावा महिन्यातील खुनांच्या घटनांनी फोल ठरला आहे. अवघ्या महिन्यात एक दोन नव्हे तर सात खुनांच्या घटना घडल्या आहेत. त्यामागे व्यक्‍तिगत कारणे असली तरी पोलिसांचा वचकही कमी झालेला आहे.

पवन सोळवंडे, विकी लाखेचा गोळ्या घालून झालेल्या खुनानंतर टोळ्यांवर पोलिसांचाही वचक कमी-जास्त होतो आहे. परिणामी समाजव्यवस्थेवरही पोलिसांचा वचक घटला आहे. महिनाभरातील खुनांमुळे समाजात भीतीचे वातावरण आहे. भरवस्तीत होणाऱ्या घटना, त्याची माहिती मिळवताना पोलिस अपयशी ठरताहेत. तेथील पोलिसांचा अंकुश ढिला झाला आहे, हे स्पष्‍ट होते. समाजात किरकोळ कारणांवरून होणाऱ्या घटनांकडे मात्र पोलिस दुर्लक्ष करत आहेत. त्यात अर्थपूर्ण व्यवहार साध्य करून दाबलेल्या घटनांमुळे पोलिसांबाबत उलटसुलट चर्चा आहे. त्यामुळे पोलिस व समाजातील हालचालींत दरी पडते आहे. परिणामी गुन्ह्यांशी संबंधित काहीच माहिती पोलिसांना मिळताना दिसत नाही. भरवस्तीतील खुनांच्या घटनांनी शहर सध्या हादरलेले आहे.

Karad Police
पोलिसांचं प्रामाणिकच काम, चित्रा वाघांनी बिनबुडाचे आरोप थांबवावेत

भरवस्तीत कोणीही यावे अन्‌ खून करून जावे, अशीच स्थिती आहे. त्यामागे बिघडलेले पोलिसिंग जबाबदार आहे. पोलिसांकडून होणारे दुर्लक्ष, डीबीच्या कर्मचाऱ्यांचा वाद अन् दुफळी असतानाच डीबीच्या जबाबदाऱ्यांत झालेली खांदेपालट घातक ठरत आहे. त्यामुळे डीबीचा वचक घटला आहे. त्या सगळ्या गोष्टी गुन्हेगारीला पूरक ठरत आहेत. त्यावर थेट उपाय न झाल्यास शहरातील वातावरण अधिक चिघळण्याची शक्यता आहे. वारूंजी येथे दोन वर्षांच्या चिमुकल्यासह महिलेचा गळा आवळून खून झाला. त्यातील संशयित माहीत आहे. मात्र, अद्यापही फरार आहे. त्याची माहितीही डीबीकडे नसल्याने तो हाती लागलेला नाही. वाखाणात भरवस्तीत परवा महिलेचा घरात शिरून खून झाला. त्याचेही काहीच धागेदोरे पोलिसांच्या हाती नाहीत. या खुनाच्या घटना ताज्या असतानाच वाघेरीत रात्री भरचौकात दांडक्याने मारहाण करून झालेल्या खुनाने पोलिस दल हादरले आहे.

Karad Police
स्मशानभूमीत अल्पवयीन मुलीच्या मांडीवर 'कोंबडा' ठेऊन पूजन

...अशी आहेत कारण

  • पोलिस खात्यांतर्गत कर्मचारी-अधिकाऱ्यांत वाद

  • पोलिसांच्या डीबी पथकाचा हरवलेला वचक

  • तपास करताना अधिकाऱ्यांतील अंतर्गत दुफळी

  • डीबीतील कर्मचाऱ्यांतील वाद

  • पोलिस ठाण्यांतर्गत अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्या

  • पोलिस अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांतील बदल

...अशा आहेत खुनाच्या घटना

  1. आठ ऑगस्ट - किरकोळ कारणावरून झारखंडच्या युवकाचा खून - दोघांना अटक

  2. 24 ऑगस्ट - वारूंजी येथे दोन वर्षांच्या बालकांसह महिलेचा खून - संशयित फरारी

  3. 25 ऑगस्ट - रुक्‍मिणीनगरात आईकडून दोन लहान मुलांचा खून - आईवर गुन्हा दाखल

  4. आठ सप्टेंबर - आगाशिवगरच्या युवकाची आत्महत्या- सहा जणांवर गुन्हा-पाच अटकेत

  5. 23 सप्टेंबर - चाफळला अल्पवयीन मुलीच्या खुनाने पोलिस हादरले - संशयित पोलिसांत हजर

  6. 25 सप्टेंबर - वाखाण भागात महिलेचा घरात शिरून खून - संशयिताचा अद्याप पत्ताच नाही

  7. 28 सप्टेंबर - वाघेरी येथे डोळ्यात चटणी टाकून खून - संशयिताचा पत्ताच नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.