सातारा : मराठा आरक्षणाच्या स्थगितीवर आमदारांच्या 'या' आहेत भावना

सातारा : मराठा आरक्षणाच्या स्थगितीवर आमदारांच्या 'या' आहेत भावना
Updated on

सातारा : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्याच्या निर्णयामुळे सातारा जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तर जिल्ह्यातील लाेकप्रतिनिधींच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. 

मराठा समाजाच्या मोर्चाचे गांभीर्य व जनतेच्या भावना लक्षात घेऊन प्रत्येक सरकारच्या काळात आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला. पाच जणांच्या खंडपीठापुढे ही केस जावी, अशी सर्वांचीच इच्छा होती; पण आता सर्वोच्च न्यायालयापुढे बाजू मांडताना सरकारच्या काही चुका, त्रुटी राहिल्या. त्या दूर करून आरक्षण कसे टिकेल याकडे लक्ष दिले पाहिजे. यासाठी राजकीय विश्‍लेषण, टीकाटिप्पणी टाळून मराठा समाजाने केलेल्या निर्णयाला न्याय देण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली पाहिजे असे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी नमूद केले.

कोविड नियंत्रणासाठी ताबडतोब ९१ कोटींचा निधी द्या : पालकमंत्री बाळासाहेब पाटील 


आमदार  शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले आरक्षणाला स्थगितीमुळे आज मराठा समाजावर अन्याय झाला आहे. याबाबत राज्य सरकारकडून बाजू निटशी मांडली गेली का, हे तपासून पाहणे गरजेचे आहे. याचे परिणाम समाजावर काय होतील, याचा विचार करावा लागणार आहे. या समाजाने शांततेच्या मार्गाने केलेली आंदोलने, मोर्चे आणि अनेकांनी बलिदानही दिले. त्याचे फळ मिळालेले नाही. आता सरकारने न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करावा, तरच मराठा समाजाला न्याय मिळेल.

साताऱ्याच्या हद्दवाढीस अजित पवारांचाच हात; आता हवे महापालिकेचे लक्ष 

शिक्षण व नोकरीत मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणीस सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. हा निर्णय दुर्दैवी असून, राज्य सरकाने आपली बाजू जोरदारपणे मांडली; पण तरीही न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाचा निर्णय मान्य करावा लागत असला, तरी शिक्षण घेणाऱ्या तसेच सुशिक्षित तरुणांवर अन्याय करणारा हा निर्णय आहे. आता राज्य सरकारने घटनापीठापुढे मराठा समाजाची बाजू सक्षमपणे लावून धरावी असे आमदार मकरंद पाटील यांनी सांगितले.

आपत्कालीन परिस्थितीत धावला वाईतील जैन समाज

आमदार  दीपक चव्हाण म्हणाले सरकारने आपली बाजू सक्षमपणे मांडली. जादा वकील देऊन सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्याचा प्रयत्न केला; पण तरीही न्यायालयाच्या या निर्णयामुळे मराठा समाजाचे वर्षभरासाठी तरी नुकसान होणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. मराठा समाजाच्या लढ्यामुळे आपण इथपर्यंत येऊ शकलो आहे. आता तात्पुरती स्थगिती दिलेली आहे. खंडपीठापुढे सरकार आणखी सक्षमपणे बाजू मांडले व त्यामध्ये निश्‍चित यश येईल.

सातारा : आरक्षण स्थगितीवर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक संतप्त; दिल्या 'या' प्रतिक्रिया

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.