भिशीच्या नावाखाली फायनान्सची सावकारी; शेतकऱ्यांसह व्यापारीही रडारवर, सणासुदीच्या तोंडावर वसुलीचा फंडा

Finance Companies : सणासुदीच्या काळात ग्रामीण भागात खासगी कर्ज वसुली अधिकाऱ्यांची दहशत वाढत आहे.
Finance Companies
Finance Companiesesakal
Updated on
Summary

बोगस कंपन्या लोकांची दिशाभूल करून पैसे उकळण्याचा कर्जाच्या नावाखाली धंदा मांडला आहे. परिणामी, लोकांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.

कऱ्हाड : सणासुदीच्या काळात ग्रामीण भागात खासगी कर्ज वसुली अधिकाऱ्यांची दहशत वाढत आहे. शहरीसह ग्रामीण भागात खासगी सावकारी बोकाळलेली असतानाच खासगी कंपन्यांच्या (Private Company) कर्ज वसुली अधिकाऱ्यांचा त्रास वाढला आहे. भिशीच्या नावाखाली तालुक्याच्या ग्रामीण भागात फायनान्स कंपन्यांची सावकारी वाढल्याचे वास्तव आहे. खासगी वसुली अधिकाऱ्यांचा जाचही टोकाचा दिसतो आहे. शेतकरी, व्यापारीही त्यांच्या वसुलीच्या रडारवर आहेत. सणासुदीच्या तोंडावर वसुलीचा फंडा तापदायक ठरतो आहे. त्या अनुषंगाने पोलिसात (Karad Police) तक्रारी दाखल होत आहेत. मात्र, कारवाई काहीच होताना दिसत नाही.

खासगी वसुलीचा धाक

तालुक्यासह गावोगावचे व्यवसाय बंद होऊन अनेकांवर बेरोजगारीची वेळ कोरोनाने आणली. त्यानंतर बाजारपेठ जरा कुठे वर येतेय, अशी स्थिती असतानाच गोवोगावच्या अल्पभूधारक शेतकऱ्यांसह अनेकांवर खासगी वसुली अधिकाऱ्यांच्या भय दिसते आहे. आर्थिक अडचणीतून सावरण्यासाठी धडपड सुरू आहे. मात्र, फायनान्स कंपन्यांची वसुली ग्रामीण भागात वाढली आहे.

Finance Companies
Ratan Tata : कुपवाडला Nano Car चं सूतोवाच; रतन टाटांचा तीन वेळा सांगली दौरा अन् 2008 मध्ये 'नॅनो' आली बाजारात

अशी वाटली कर्जे

खासगी फायनान्स कंपन्यांनी गावोगावी मार्केटिंग नेटवर्कद्वारे ग्रामस्थांची गरज ओळखून आठवड्याच्या हप्त्यावर कर्जे वाटली आहेत. त्याचे व्याज मनानुसार आकारले आहे. मागेल त्याला पैसे देत ते व्याजदर अमर्याद घेत आहेत. कंपन्यांचे प्रतिनिधी सुटाबुटात येत असल्याने त्या खासगी सावकारीला वेगळा मुलामा दिल्याचे दिसते. त्यात विविध फायद्याच्या योजना सांगून ते लोक भुरळ घालून कर्जे वाटताहेत. त्यानंतर वसुलीलाही ते तगादा लावताहेत. मिनी फायनान्सद्वारे अनेकांनी लाखो रुपये गुंतवून अनधिकृत सावकारी चालू केली आहे.

Finance Companies
'या' योजनांसाठी KYC अपडेट करा असा Message येतोय? मग, सावधान! फसव्या लिंकला वयस्कर लोक पडताहेत बळी

वर्षभरात दहा गुन्हे

कोरोनानंतरच्या काळात ग्रामीण शहरी भागातील लघु उद्योजक, व्यावसायिकांसह शेतकऱ्यांचेही आर्थिक बजेट विस्कटले आहे. त्याचा विचार न करता खासगी फायनान्स कंपन्यांकडून सर्रास वसुली सुरू आहे. खासगी फायनान्स कंपन्यांनी त्यांच्या भिशीच्या नावाखाली खासगी सावकारी सुरू ठेवली आहे. ती बोकाळल्याने कंपन्यांची सावकारी गावोगावी वाढल्याची विदारक स्थिती आहे. पोलिसांत त्या विरोधात वर्षभरात खासगी सावकारीचे १० गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्ह्यांचा तपास अद्यापही सुरूच आहे. त्यात बचत गटातील महिलांसह अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यांच्याकडे वसुलीचा तगादा सुरू आहे. तरीही त्यावर निर्बंध येताना दिसत नाहीत.

Finance Companies
पुरामुळे 47 हजार 891 हेक्टर क्षेत्रांतील पिकांचे नुकसान, 1 लाखांवर शेतकऱ्यांना फटका; पूरनुकसानीचे 122 कोटी जमा

बनावट कंपन्यांकडे दुर्लक्ष

बोगस कंपन्या लोकांची दिशाभूल करून पैसे उकळण्याचा कर्जाच्या नावाखाली धंदा मांडला आहे. परिणामी, लोकांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन अशा महिलांची कर्जाच्या नावाखाली सावकारी पाशात अडकवणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आहे. शहरासह ग्रामीण भागात तब्बल दहा गुन्हे त्या संबंधाने दाखल झाले आहेत. त्याच्या तपास अद्यापही सुरू असतानाचा खासगी कंपन्यांची सुरू असलेली वसुली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मागील काही वर्षांत खासगी फायनान्स कंपन्यांनी लूट केल्याचे वास्तव ताजे असतानाही कर्ज वाटणाऱ्या फायनान्स कंपन्या नव्या मार्गाने सावकारीतून लोकांची लूट करण्यासाठी येताना दिसताहेत. अनेक कंपन्या बनावट आहेत. त्यांची चौकशी करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.