कराड : काले- संजयनगर येथील नाईकबाचा माळ नावाच्या शिवारात (मंगळवारी) रात्री साठेआठ ते नऊच्या सुमारास बिबट्याने संतोष पाटील यांच्या घराच्या सोप्याकडे अचानक धाव घेतली. कुत्र्यांनी जोरात भूकुंन भूकुंन बिबट्याला घरापासून हुसकावून लावले. बिबट्याच्या येण्यामुळे त्या परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे.
संजयनगर येथील संतोष पाटील हे नाईकबाचा माळ नावाच्या शिवारात बंगला बांधून वास्तव्यास आहेत. त्यांच्या परिसरात कालवडे - नांदगावच्यामधला सुळ्याचा डोंगर आहे. या परिसरात त्यांचे एकमेव घर आहे. (मंगळवारी) रात्री साडे आठ नऊच्या सुमारास बिबट्याने संतोष पाटील यांच्या घराच्या सोप्याकडे अचानक धाव घेतली. त्यादरम्यान कुत्र्यांनी जोरात भूकुंन बिबट्याला घरापासून हुसकावून लावले.
बिबट्याच्या शिकारीसाठी धवलसिंह मोहिते- पाटीलांना 'यामुळे' निवडले ! बिबट्याला ठार मारण्याची परवानगी केव्हा मिळते माहितीय का?
कुत्र्यांच्या भुकंण्याने पाटील व त्यांचे कुटुंबीयांनी खिडकीतून बाहेर बघितल्यावर त्यांना घराबाहेर बिबट्या असल्याचे दिसले. कुत्र्यांच्या भुंकण्याने बिबट्या पळून गेला. त्यानंतर पाटील कुटुंबियांनी सीसीटीव्ही कॅमेराचे चित्रीकरण तपासले. त्यामुळे बिबट्या घराच्या पाय-या चढून येताना दिसला. त्याला पाहताच कुत्र्यांनी भुंकण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्याने पळ काढल्याचे दिसून आले. दरम्यान बिबट्याच्या येण्यामुळे त्या परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे. यापूर्वीही बिबट्याचे दर्शन झाल्याचे पाटील यांनी ई-सकाळशी बाेलताना सांगितले. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी पाटील कुटुंबियांनी केली आहे.
— Siddharth Latkar (@siddharthSakal) December 23, 2020
Edited By : Siddharth Latkar
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.