तांबवे (सातारा) : साजूर (ता. कऱ्हाड) येथील बाराभाई शिवारात तीन वर्षाचा बिबट्या (Leopard) जखमी अवस्थेत आज मंगळवारी पहाटे सापडला आहे. शेतकऱ्यांनी (Sajur Village Farmer) त्यास पाहून वनविभागाला (Forest Department) तत्काळ माहिती दिली. वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पुढील कार्यवाही सुरू केली आहे. तांबवे गावच्या पश्चिमेस साजूर हे गाव आहे. पाठरवाडी डोंगरापासून काही अंतरावर असलेल्या या गावात पाठरवाडीतील बिबट्यांचा वावर असतो. मध्यंतरी साजूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात जनावरे जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. (Leopard Injured In Barabhai Farm At Sajur Village bam92)
आज मंगळवारी पहाटे साजूर येथील बाराभाई शिवारात शेतकरी अनिल शंकर चव्हाण हे जात असताना त्यांना काहीतरी वाजत असल्याचा आवाज आला.
दरम्यान, आज मंगळवारी पहाटे साजूर येथील बाराभाई शिवारात शेतकरी अनिल शंकर चव्हाण हे जात असताना त्यांना काहीतरी वाजत असल्याचा आवाज आला. त्यांनी तत्काळ तिकडे पाहिल्यावर त्यांना जखमी अवस्थेत असलेला बिबट्या दिसला. काही काळ त्यांना सूचले नाही, मात्र त्यांनी तत्काळ त्याची माहिती ग्रामस्थांना दिली.
ग्रामस्थांनी तत्काळ वन विभागाला त्याची माहिती दिली व वन विभागाचे कर्मचारी साजूरच्या शिवारात दाखल झाले आहेत. संबंधित बिबट्याला नेमके काय झाले असावे, या संदर्भातील माहिती घेण्याचे काम वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केले आहे. घटनास्थळी साजूर ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
Leopard Injured In Barabhai Farm At Sajur Village bam92
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.