शेतात ओढत नेऊन मुलाला ठार करणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद

Forest Department Karad
Forest Department Karadesakal
Updated on
Summary

दोन आठवड्यापूर्वी ऊसतोड मजुराच्या एका मुलावर बिबट्यानं पहाटेच्या सुमारास हल्ला करून त्याला ठार केलं होतं.

कऱ्हाड / विंग (सातारा) : ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुराच्या अवघ्या चार वर्षाच्या मुलाला उसाच्या शिवारात बिबट्यानं (Leopard) उचलून नेलं. काही अंतर गेल्यावर संबंधित मुलाला ठार करून त्याला तिथंच सोडून बिबट्यानं उसाच्या शिवारात धूम ठोकली होती. या घटनेमुळं त्या परिसरात असलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागानं शिवारात पिंजरा लावला होता, त्यामध्ये आज पहाटेच्या सुमारास बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला (Forest Department Karad) यश आलंय.

दरम्यान, बिबट्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली आहे. येनके-किरपे परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्याचा वावर आहे. त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी अनेकदा केली होती. मात्र, बिबट्याच्या बंदोबस्तासाठी पिंजरा लावण्यात आलेला नव्हता. दरम्यान, दोन आठवड्यापूर्वी ऊसतोड मजुराच्या एका मुलावर बिबट्यानं पहाटेच्या सुमारास हल्ला करून त्याला ठार केलं होतं.

Leopard
Leopard
Forest Department Karad
'मोदींच्या दाढीत घरंच घरं'; एकदा दाढी झाडली की, 50 लाख घरं बाहेर पडतात'

त्यामुळं वन विभाग खडबडून जागा झाला होता. त्यांनी संबंधित ठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तीन ट्रॅप कॅमेरे लावले होते. एका ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान, आज शनिवारी पहाटेच्या सुमारास संबंधित पिंजऱ्यात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाला यश आलं असून यामुळं ग्रामस्थांनीही सुटकेचा निश्वास टाकला आहे.

Forest Department Karad
'बंटी पाटलांनी जवळीकता इतकी वाढवली, की भाजपलाही पत्ता लागला नाही'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()