सातारा : दुर्लक्षित माणचा समृद्ध प्राचीन इतिहास उजेडात

माणगंगेकाठी सापडला अनमोल खजिना
 ancient history of the neglected maan
ancient history of the neglected maansakal
Updated on

दहिवडी : दुर्लक्षित माण तालुक्याचा समृध्द प्राचीन इतिहास उजेडात (ancient history of maan)आणण्याचं महत्वपूर्ण काम सुरु असून माणगंगेकाठी सुमारे तीन हजार वर्षांपूर्वीचे अवशेष सापडले आहेत. यामुळे माणच्या (Satara)भूमीला वेगळे महत्व प्राप्त होणार आहे. या खजिन्याकडे दुर्लक्ष केल्यास तो संकटात येण्याची अथवा नष्ट होण्याची शक्यता आहे.दहिवडीचे सुपुत्र नुकतेच सेवानिवृत्त झालेले कमांडो सुनिल काटकर हे २००५ पासून संशोधनाचं काम करत आहेत. त्यांना गोंदवले जवळ माण नदीच्या पात्रालगत साधारण दहा ते बारा एकर परिसरात प्राचीन काळातील अवशेष पसरलेले सापडले आहेत. यात मातीची भांडी, घरगुती वापराच्या वस्तु, शंखांच्या बांगड्या, दगडी मणी, माणके, मोती, खेळणी, गळ्यात घालण्याची आभुषणे सापडली आहेत. सैबेरीया व अफगानिस्तान या देशात दगडाच्या खाणीत सापडणारे लाजावर्द या रत्नांचे खडे या ठिकाणी मिळुन आलेले आहेत.

 ancient history of the neglected maan
भारत-पाकिस्तान फाळणीत झाली ताटातूट, तब्बल 74 वर्षांनंतर भेट!

कोल्हापुर/कराड पासुन तेर या प्राचीन शहरांना जोडणारा रस्ता गोंदवले गावावरुन जात होता हे या संशोधनातून स्पष्ट होत आहे. या प्राचीन रस्त्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी त्यांनी खुप मेहनत घेतलेली आहे. गोंदवले येथे सापडलेले अवशेष तामिळनाडु मधले किलाडी व जुन्नर तसेच तेर या ठिकाणी सापडलेल्या अवशेषासारखेच आहेत. सिंधु संस्कृतीची शहरे धोलावीरा, लोथल, राखीगडी, हडप्पा मोहेंजोदडो, रापड सिनौली या ठिकाणी जसे अवशेष सापडले आहेत अगदी तंतोतंत तसेच अवशेष या ठिकाणी सापडत आहेत. माणगंगेकाठी शंखांपासून बांगड्या तयार करणाऱ्या कारागिरांची वस्तीच सुमारे साडेतीन हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात असावी अशा निष्कर्षाप्रत संशोधक आले आहेत. येथे सापडलेले असंख्य अवशेष थेट सातवाहन काळात नेणारे असून, कारागिरांनी वापरलेली अवजारे उत्तर ताम्रपाषाण युगातील असल्याचा अंदाज आहे.(Satara News)

 ancient history of the neglected maan
PM मोदींची सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुरु; ठाकरेंऐवजी टोपेंची हजेरी

येथे प्रचंड संख्येने आढळलेले शंखांच्या बांगड्यांचे कातकाम केलेले तुकडे, बांगडी घासण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सहाणी, कोरीव कामासाठी वापरल्या जाणाऱ्या सूक्ष्माश्म अवजारांचे तुकडे पाहता, निर्यातीसाठी बांगड्या बनविण्याचा कारखानाच येथे अस्तित्वात होता, या निष्कर्षाला अभ्यासक पोहोचले आहेत. येथे सापडलेले शंख ‘टर्बुनिल्ला पायरम’ जातीचे असून, ते केवळ तमिळनाडू किंवा सौराष्ट्रातील खंबातच्या आखातात सापडतात. माणमध्ये सापडलेले शंख खंबातच्या आखातातील असावेत. लाटेबरोबर वाहत आलेल्या मोठ्या शंखाच्या पोटात लहान शंख आढळतात, तेही येथे आढळले असून, बांगड्या बनविताना शंखाचा काढून टाकलेला गाभाही आढळला आहे. मेसोपोटेमिया भागातून शंखांच्या बांगड्यांना त्याकाळी मोठी मागणी होती. या बांगड्या भारतातून तिकडे जात असत, याचे पुरावे पूर्वीच आढळले आहेत. सिंधू संस्कृतीतही शंखांच्या बांगड्यांचे पुरावे आढळले असून, दंडापर्यंत बांगड्या घातलेल्या नर्तकीचे शिल्प हडप्पामध्ये सापडले होते. या शृंखलेची कडी माण तालुक्याशी जोडली गेल्याचा पुरावा आता सापडल्याने प्राचीन इतिहासाच्या दृष्टीने माण तालुक्यास मोठे महत्त्व प्राप्त होण्याची चिन्हे आहेत.

"सातारच्या जिज्ञासा इतिहास संशोधन संस्थेच्या सदस्यांनी यापूर्वी येथे संशोधन केले होते. खटावच्या शहाजीराजे महाविद्यालयाचे प्राध्यापक अमृत सांळुखे यांनीही यासाठी मेहनत घेतलेली आहे. या परिसरात ठिकठिकाणी उत्खनन केल्यास पुरातात्विकदृष्ट्या मोठा खजिना सापडण्याची शक्यता आहे. पुरातत्व विभागाने या महत्वाच्या जागेकडे लक्ष देवून अधिक अभ्यास केल्यास निसर्ग पर्यटनाबरोबरच ऐतिहासिक पर्यटनाला चालना मिळेल."

- सुनिल काटकर, इतिहास व पुरातत्व अभ्यासक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.