Udayanraje Bhosale: मला लोकांनी पाडायला पाहिजे होतं, असं का म्हणाले खासदार उदयनराजे भोसले?

Satara Loksabha Election Result 2024: एवढी वर्ष तुम्ही ज्यांना भरभरून मतदान केलं त्यांनी काय केलं?
Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosalesakal
Updated on

Karhad: महायुती कशात कमी पडली, अपेक्षित यश मिळाल नाही. खरंतर मलाही पाडायला पाहिजे होते. जे लोक तुमच्यासाठी झटतात, झगडतात याचं मोजमाप होणार आहे की नाही ? मोजमाप झालं पाहिजे.

पाडा, खाल्लास करा, मारून टाका, जे लोक तुमच्यासाठी झटले त्यांना तुम्ही पाडणार आणि एवढं वर्ष तुम्ही ज्यांना बरोबर मतदान केलं त्यांनी काय केलं ? असा खेद व्यक्त केला.

Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosale : यशवंतराव चव्हाणांचा मी मानसपुत्र नाही; असं का म्हणाले उदयनराजे?

मलाही पाडायला पाहिजे होतं

लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघातून विजयी झालेल्या खासदार भोसले यांचे शनिवारी कऱ्हाड शहरात जल्लोषात स्वागत झाले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही यावर ते म्हणाले, पाडा, खाल्लास करा, मारून टाका असे म्हणत राग व्यक्त केला. महायुती कशात कमी पडली, अपेक्षित यश मिळाल नाही.

खरंतर मलाही पाडायला पाहिजे होतं. जे लोक तुमच्यासाठी झटतात, झगडतात याचं मोजमाप होणार आहे की नाही. तेव्हा मोजमाप झालं पाहिजे. पाडा, खाल्लास करा, मारून टाका. जे लोक तुमच्यासाठी झटले त्यांना तुम्ही पाडलं. एवढं वर्ष तुम्ही ज्यांना भरभरून मतदान केलं त्यांनी काय केलं, असाही सवाल उदयनराजेंनी उपस्थित केला.

Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

पाण्याचा प्रश्न सर्वात मोठा

सध्या पाण्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे. तो सोडवावा, असे कॉंग्रेसची सत्ता असतानाही कोणालाही वाटले नाही. लोक मतदान करतात त्यामुळे सत्ता मिळते. मी कृष्णा खोरे विकासाची संकल्पना मी मांडली. त्याला गोपीनाथ मुंढे यांनी साथ देवुन त्याचे महामंडळ स्थापन केले. त्यामुळे धरणांची कामे झाली. त्यामुळे दुष्काळी भागातील लोकांना दिलासा मिळाला आहे.

माझे सर्व मीत्र देव आहेत

देवापेक्षा कोणी मोठं नसते. निकाल काही जरी लागला असता तरी जे लोक माझ्यासाठी झटतात, जे माझे मीत्र आहेत त्यांच्यामुळे मी आहे. देव एक उपमा असती. माझे जेवढे मीत्रमंडळी आहेत ते माझ्यासाठी देव आहेत. लोकांच्या माध्यमातुन आम्ही दोघच नाही तर सर्वजण मिळुन आम्हाला जेवढे काम करता येईल तेवढे काम आम्ही करणार आहोत. कोण काय करते यापेक्षा आम्ही कार्यरत राहणार असुन लोकांच्या मुलभुत समस्या दुर करण्याचे काम सरकार करत आहे. विकास कामाच्या माध्यमातुन भविष्यात महायुतीचे उमेदवार निवडुन येतील.

Udayanraje Bhosale
MP Udayanraje Bhosale : शरद पवारांचा पक्ष साडेतीन जिल्ह्यापुरताच मर्यादित; खासदार उदयनराजेंची टिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com