Loksabha Election : लोकसभेसाठी उदयनराजेंना BJP कडून तिकीट मिळणार की नाही? चित्रा वाघ यांनी मनातलं स्पष्टच बोलून दाखवलं..

महिलांनी देश का नेता कैसा हो उदयनराजे जैसा हो, उदयनराजे आप आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशी घोषणाबाजी केली.
Chitra WaghUdayanraje Bhosale
Chitra WaghUdayanraje Bhosaleesakal
Updated on
Summary

'विधान परिषदेच्या निवडणुकीत सगळ्यांनी पुरुषांना संधी; पण आमचा एकमेव पक्ष आहे, की ज्याने महिलेला संधी दिली.'

सातारा : सातारा लोकसभेसाठी भाजपकडून (BJP) उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनाच उमेदवारी मिळावी, अशी आग्रही मागणी महिला मेळाव्यात झाली. यावेळी चित्रा वाघ यांनी उदयनराजेंना उमेदवारी मिळावी, ही साताऱ्यातील सर्व भगिनींची इच्छा असून, त्यांच्या भावना आम्ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोचविणार आहे. आमचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व चंद्रशेखर बावनकुळे याबाबत सकारात्मक निर्णय घेतील, असा विश्वास भाजप महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी व्यक्त केला.

भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने महिला दिनानिमित्त नारीशक्ती वंदना मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यानंतर चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी महिलांनी देश का नेता कैसा हो उदयनराजे जैसा हो, उदयनराजे आप आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशी घोषणाबाजी केली.

Chitra WaghUdayanraje Bhosale
रामेश्वरम् कॅफे बॉम्बस्फोटातील संशयित दहशतवाद्याचे रेखाचित्र व्हायरल; आरोपी बसमधून तुमकूरहून बळ्ळारीत गेल्याचा संशय

आजच्या मेळाव्यात सर्व महिलांनी उदयनराजेंच्या उमेदवारीची मागणी केली आहे, नेमकी काय भूमिका आहे आपली, यावर चित्रा वाघ म्हणाल्या, ‘‘एक बहीण म्हणून जी माझी इच्छा आहे, तीच इच्छा साताऱ्यातील प्रत्येक ताईची आहे. इच्छा व्यक्त करणे हे साताऱ्यातील बहिणींचा धर्म आहे. तो आम्ही पूर्ण करतोच. या सगळ्या बहिणींचा विचार आम्ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यापर्यंत पोचविणे, हे कार्यकर्ती म्हणून माझे कामच आहे. आम्हा सर्व बहिणींच्या या मागणीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सकारात्मक व योग्य निर्णय घेतील,’’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महायुतीतून लोकसभेसाठी यावेळेस किती महिलांना उमेदवारी दिली जाईल, या प्रश्नावर चित्रा वाघ म्हणाल्या, ‘‘विधान परिषद व विधानसभेत सर्वांत जास्त महिला आमदार या भाजपच्या आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत सगळ्यांनी पुरुषांना संधी; पण आमचा एकमेव पक्ष आहे, की ज्याने महिलेला संधी दिली. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत सुद्धा महिलांनाच प्राधान्य दिले जाईल,’’ असे सांगितले.

Chitra WaghUdayanraje Bhosale
Chitra Wagh : शरद पवारांच्या पक्षातील दुसरी पिढी कमकुवत, हे पाहून वाईट वाटतं; चित्रा वाघ यांचा निशाणा

त्यांचे मानसिक संतुलन बिघडलंय...

गृहमंत्र्यांचे काम बरोबर असते, तर आमच्यावर ही वेळ आली नसती, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. यावर चित्रा वाघ म्हणाल्या, ‘‘मोठ्या ताईंना थोडा विचार करायला वेळ द्या. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्या चांगल्याच हलल्या आहेत. तुम्ही त्यांना इतके वर्षे पाहताय, त्यांच्या मनाचा थोडा विचार करा. त्या बोलत असतील, तर त्याकडे फार लक्ष देऊ नका,’’ अशा शब्दांत त्यांनी खिल्ली उडवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.