Loksabha Election : माढा, सातारा लोकसभेचा खासदार कोण होणार? आमदार गोरेंनी केला भाजपच्या विजयाचा दावा

'रामराजेंचे आणि माझे मैत्रीचे संबंध तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. त्यामुळे त्यावर जास्त काही बोलावं, असे वाटत नाही.'
MLA Jaykumar Gore
MLA Jaykumar Goreesakal
Updated on
Summary

‘‘त्यावेळी रामराजे आमच्याबरोबर नव्हते, तरीही रणजितसिंह खासदार झाले. तेव्हाही खासदार भाजपचाच होता आणि आताही भाजपचाच असणार आहे.''

सातारा : माढा, सातारा लोकसभेचा खासदार हा भाजपचाच (BJP) होणार असून, त्यादृष्टीने आम्ही दोन्ही मतदारसंघांत तयारी केली आहे, असे सांगून जिहे- कठापूर योजनेचे आंधळी धरणातील पाण्याचे जलपूजन येत्या रविवारी (ता. २५) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. माण- खटाव तालुक्यातील दुष्काळ हटाव मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे, अशी माहिती आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी दिली.

येथील शासकीय विश्रामगृहात आमदार गोरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. माण व खटाव तालुक्याचा दुष्काळ पाच वर्षांत पुसून टाकणार असून, येत्या २५ फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते जिहे-कठापूरच्या सिंचन योजनेच्या पाण्याचे जलपूजन आंधळी धरण येथे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

MLA Jaykumar Gore
Satej Patil : 'सतेज पाटलांचं नेतृत्व महाराष्ट्र मान्य करेल'; काँग्रेसच्या 'या' बड्या नेत्याकडून सूतोवाच

आमदार गोरे म्हणाले, ‘‘माण, खटाव तालुक्यातील दुष्काळ हटाव मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू आहे. यातील जिहे-कठापूर सिंचन योजनेचा पहिला टप्पा पूर्णत्वास जात आहे. या योजनेच्या आंधळी धरणातील पाण्याचे जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे, अशी इच्छा होती. मात्र, पंतप्रधान मोदी यांना येणे शक्य झाले नाही, म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या रविवारी (ता. २५) सकाळी ११ वाजता जलपूजनाचा कार्यक्रम आहे. हा एक ऐतिहासिक क्षण असणार आहे. उरमोडी पाणी ९७ गावांत, तर तारळीचे पाणी शेवटच्या टप्प्यापर्यंत पोचले आहे.’’

MLA Jaykumar Gore
Jaigad Fort : जयगड किल्ल्याच्या बुरुजाला कशामुळे तडे? पुरातत्त्व विभागाच्या पाहणीनंतर महत्त्वाचा अहवाल समोर

माण, खटाव तालुक्यातील ४२ गावांसाठी टेंभूचा सहावा टप्पा मंजूर झाला आहे. शासनाने त्याला एआयबीपीअंतर्गत मान्यता दिली आहे. यामध्ये अडीच टीएमसी पाणी मंजूर झाले आहे. ऑगस्ट महिन्यात टेंभू योजनेचा भूमिपूजन सोहळा होणार आहे, असे गोरे यांनी सांगितले.

रामराजेंना फलटणमध्ये प्रतिउत्तर देणार

विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या टीकेला उत्तर देताना आमदार गोरे म्हणाले, ‘‘रामराजेंचे आणि माझे मैत्रीचे संबंध तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. त्यामुळे त्यावर जास्त काही बोलावं, असे वाटत नाही. त्यांची विधाने त्यांच्या उंचीला शोभतात का? ते अनेकांना सांगतात की, गोरे किंमत ठेवत नाहीत. शेवटी ही गिव्ह ॲण्ड टेक पॉलिसी असते. किंमत द्यावी लागते तेव्हा किंमत मिळते, असा सल्ला देत त्यांनी त्यांची भूमिका मांडली. आता भूमिका मांडण्याची वेळ माझी आहे आणि ती मी फलटणमध्ये जाऊन मांडणार आहे.’’

MLA Jaykumar Gore
Udayanraje Bhosale : पश्चिम घाटातील धार्मिक, ऐतिहासिक पर्यटनस्थळांसाठी तब्बल 381 कोटी; खासदार उदयनराजेंची माहिती

माढ्यात भाजपचाच उमेदवार

माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह निंबाळकर हे खासदार होऊ नयेत, यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नाबाबत त्यांना विचारले असता आमदार गोरे म्हणाले, ‘‘त्यावेळी रामराजे आमच्याबरोबर नव्हते, तरीही रणजितसिंह खासदार झाले. तेव्हाही खासदार भाजपचाच होता आणि आताही भाजपचाच असणार आहे. सातारा व माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढण्यास भाजप सक्षम आहे. त्यामुळे येथील उमेदवार आमच्याच पक्षाचा असेल.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()