Loksabha Election : माढ्याचा पुढील खासदार काँग्रेस पक्षाचाच असेल; माजी मुख्यमंत्र्यांचं थेट भाजपलाच चॅलेंज

बोराटवाडीच्या गड्याने पिठाची गिरणी तरी उभी केलीय का?
Prithviraj Chavan News
Prithviraj Chavan Newsesakal
Updated on
Summary

'पृथ्वीराज बाबांमुळे माण- खटावला पाणी आले, त्यांचे नाव घेण्याची दानत या आमदारांकडे नाही.'

दहिवडी : देशासह राज्यातील वातावरण बदलू लागले आहे. विश्वासू आणि सामान्य जनतेचा पक्ष म्हणून जनता काँग्रेसकडे पाहतेय. माढा मतदारसंघातील (Madha Constituency) पुढील खासदार हा काँग्रेस पक्षाचा असेल, असं स्पष्ट मत पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी व्यक्त केलं.

Prithviraj Chavan News
Loksabha Election : कोल्हापुरात काँग्रेसची मोठी खेळी! लोकसभेसाठी 'या' दिग्गज नेत्यांना उतरवणार रिंगणात?

भाजप खासदार निवडून आपण नुकसान करून घेतल्याची जाणीव इथल्या मतदारांना झाली आहे, असेही प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. माढा लोकसभा मतदारसंघातील माण, खटाव व फलटण विधानसभा मतदारसंघनिहाय प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक दहिवडी येथील सिद्धनाथ मंगल कार्यालयात झाली. त्या वेळी ते बोलत होते.

Prithviraj Chavan News
NCP Crisis : राजकारणात बेरीज करायची असते, भागाकार-वजाबाकी होऊ नये म्हणून..; 'साहेब-दादा' भेटीवर काय म्हणाले जयंत पाटील?

यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह देशमुख, सुरेश चव्हाण, श्रीरंग चव्हाण, उदयसिंह पाटील, राजेंद्र शेलार, भानुदास माळी, अल्पना यादव, झाकीर पठाण, जगन्नाथ कुंभार, अमरजित कांबळे, बाळासाहेब माने, एम. के. भोसले, नकुसा जाधव आदी उपस्थित होते.

आमदार चव्हाण म्हणाले, ‘‘मोदी सरकारमुळे देश आर्थिक संकटाकडे वाटचाल करतोय. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी राज्य सरकार बदल्यांमध्ये भ्रष्टाचार करत आहे. एकनाथ शिंदे हे फक्त नावापुरते मुख्यमंत्री आहेत.’’ धवलसिंह मोहिते-पाटील म्हणाले, ‘‘या मतदारसंघात स्वतंत्र लढल्यास खासदार काँग्रेसचाच होईल.’’

Prithviraj Chavan News
PN Patil : शरद पवारांना अडचणीत आणणाऱ्या महाडिकांना तेंव्हाच धोक्याची घंटा दिली होती; काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट

मोहन जोशी म्हणाले, ‘‘पृथ्वीराज बाबांमुळे इथला आमदार घडला. पाणी आणण्यामध्ये बाबांचा मोठा हात आहे, तरीही इथला आमदार बाबांचा काही संबंध नाही, असे म्हणत आहे. येत्या निवडणुकीत त्याला त्याची जागा दाखवून द्या.’’ या वेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Prithviraj Chavan News
Kolhapur : भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसला मोठी संधी; 'या' दोन बड्या नेत्यांनी एकजूट दाखवली तर बदलणार संपूर्ण चित्र

जलनायक नव्हे...

माण- खटावमध्ये मी दोन सूतगिरणी उभ्या केल्या. बोराटवाडीच्या गड्याने पिठाची गिरणी तरी उभी केलीय का? युवकांना रोजगार मिळावा, म्हणून साखर कारखाना उभारायचे नियोजन मी केले तर लगेच इथला आमदार आडवे पडले.

महादेव जानकरांनी आवाज उठविल्यामुळे सुरू झालेल्या चारा छावण्यांची बिले रखडविण्याचे काम यांनी केले. ज्या पृथ्वीराज बाबांमुळे माण- खटावला पाणी आले, त्यांचे नाव घेण्याची दानत या आमदारांकडे नाही. त्यामुळे हे जलनायक होऊ शकत नसल्याचा टोला रणजितसिंह देशमुख यांनी आमदार जयकुमार गोरे यांना लगावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()