पदाधिकारी, नगरसेवकांचे प्रभाग झाले आरक्षित; महिलांसाठी नऊ जागा राखीव

पदाधिकारी, नगरसेवकांचे प्रभाग झाले आरक्षित; महिलांसाठी नऊ जागा राखीव
Updated on

लोणंद (जि. सातारा) ः लोणंद नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी नगरपंचायतीच्या सभागहात प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत चिठ्ठी पद्धतीने आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीत 17 पैकी 9 जागा महिलांसाठी राखीव राहिल्या आहेत.

त्यामध्ये अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी एक, अनुसूचित जातीच्या महिलेसाठी एक, इतर मागास प्रवर्गातील महिलांसाठी तीन, तर सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी चार जागा राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी एक, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी दोन, तर सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी 5 जागा राहिल्या आहेत. त्यामुळे पदाधिकारी व नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित झाल्याने अनेकांची गोची झाली आहे.
 
नगराध्यक्ष सचिन शेळके यांचा प्रभाग तीन हा अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाल्याने त्यांना अन्य मतदारसंघ धुंडाळावा लागणार आहे. उपाध्यक्ष किरण पवार यांचा प्रभाग दहा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव राहिल्याने त्यांचाही पत्ता कट झाला आहे. नगरसेवक हणमंतराव शेळके यांचा प्रभाग एक ओबीसी महिलेसाठी राखीव झाल्याने त्यांची निवडणुकीची संधी गेली आहे. माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके यांचा प्रभाग चौदा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने त्यांचीही संधी हुकली आहे. माजी नगराध्यक्षा स्नेहलता शेळके यांचा प्रभाग नऊ सर्वसाधारण जागेसाठी खुला राहिल्याने त्यांना निवडणुकीची पुन्हा संधी प्राप्त झाली आहे. प्रभाग सहा सर्वसाधारण ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाल्याने विरोधी पक्षनेते राजेंद्र डोईफोडे यांचीही संधी गेली आहे. प्रभाग 17 खुला राहिल्याने नगरसेविका दीपाली क्षीरसागर यांना पुन्हा संधी प्राप्त झाली आहे. प्रभाग 16 ओबीसी महिलेसाठी राखीव राहिल्याने नगरसेवक योगेश क्षीरसागर यांची संधी गेली आहे.

भारत माता की जय, वंदे मातरम्‌च्या जयघोषाने दुमदुमला मालवणचा किनारा

प्रभाग 15 ओबीसी सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित झाल्याने नगरसेविका लीलाबाई जाधव यांना पुन्हा निवडणुकीची संधी प्राप्त झाली आहे. प्रभाग 13 सर्वसाधारण महिलेसाठी राखीव राहिल्याने नगरसेवक ऍड. पी. बी. हिंगमिरे यांची संधी गेली आहे. प्रभाग 12 सर्वसाधारण महिलेसाठी खुला झाल्याने नगरसेविका स्वाती भंडलकर यांना पुन्हा संधी प्राप्त झाली आहे. प्रभाग 11 सर्वसाधारण राहिल्याने नगरसेविका कुसुम शिरतोडे यांना पुन्हा संधी प्राप्त झाली आहे. प्रभाग सात अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने नगरसेविका कृष्णाबाई रासकर यांची संधी गेली आहे. प्रभाग पाच खुला राहिल्याने नगरसेविका हेमलता कर्नवर यांना पुन्हा संधी प्राप्त झाली आहे. प्रभाग चार खुला राहिल्याने नगरसेविका शैलजा खरात यांना पुन्हा संधी प्राप्त झाली आहे. प्रभाग आठ अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव राहिल्याने नगरसेविका मेघा शेळके यांची संधी हुकली आहे. 

अशी आहे स्थिती 

अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव - प्रभाग आठ
 
अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव - प्रभाग तीन व सात
 
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव - प्रभाग 1, 2, 16, 15, 6
 
सर्वसाधारण प्रवर्ग : 4 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.