सातारा : लूटमार करणारी टोळी तीन जिल्ह्यांतून तडीपार; पाच गुंडांचा समावेश

लोणंद परिसरात मारहाण करून लूटमार व गायींची चोरी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला संपूर्ण सातारा जिल्हा, पुणे जिल्ह्यातील तीन व सोलापूर जिल्ह्यातील एका तालुक्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश.
crime
crimecrime
Updated on
Summary

लोणंद परिसरात मारहाण करून लूटमार व गायींची चोरी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला संपूर्ण सातारा जिल्हा, पुणे जिल्ह्यातील तीन व सोलापूर जिल्ह्यातील एका तालुक्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश.

सातारा - लोणंद परिसरात मारहाण (Beating) करून लूटमार (Loot) व गायींची चोरी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला (Gang) पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी संपूर्ण सातारा जिल्हा, तसेच पुणे जिल्ह्यातील तीन व सोलापूर जिल्ह्यातील एका तालुक्यातून दोन वर्षांसाठी तडीपार (Tadipaar) करण्याचे आदेश दिले आहेत.

टोळीप्रमुख पप्पू सर्जेराव जाधव (वय २४) व संजय ऊर्फ दादा बारीकराव जाधव (वय ३७, दोघे रा. मुळीकवाडी, ता. फलटण), अजित महादेव बोडरे (वय २८) व अनिल अशोक तुपे (दोघेही रा. तांबवे, ता. फलटण) आणि तुषार बाळासो पाटोळे (वय २०, रा. तरडगाव, ता. फलटण) अशी त्यांची नावे आहेत. या पाच जणांना वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करून सुधारण्याची संधी देण्यात आली होती; परंतु त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती. त्यांच्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे त्यांना तडीपार करण्याबाबत लोणंद पोलिसांनी पोलिस अधीक्षकांकडे तडीपारीचा प्रस्ताव पाठविला होता. त्यावर सुनावणी घेऊन अधीक्षक बन्सल यांनी पाचही जणांना संपूर्ण सातारा जिल्हा, तसेच पुणे जिल्ह्यातील बारामती, भोरे व पुरंदर, तसेच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले.

crime
नदीत उडी मारलेल्या मुलीचे दोन युवकांनी वाचवले प्राण

हद्दपार प्राधिकरणाकडे सरकारच्या वतीने अतिरिक्त अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक किशोर धुमाळ, उपनिरीक्षक मधुकर गुरव, हवालदार प्रमोद सावंत, केतन शिंदे, अनुराधा सणस, तसेच लोणंद पोलिस ठाण्याचे हवालदार नाळे यांनी पुरावे सादर केले. अशांतता पसरविण्याविरुद्ध यापुढेही अशी कडक कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा अधीक्षक बन्सल यांनी दिला आहे.

तडीपारांची शंभरी

पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी आजपर्यंत २७ प्रस्तावांमध्ये तडीपारीचे आदेश दिले आहेत. आजच्या २८ व्या प्रस्तावात त्यांनी पाच जणांना तडीपार केले आहे. या प्रस्तावातील एकूण तडीपारांची संख्या १०३ झाल्याने पोलिस अधीक्षकांनी तडीपारीच्या कारवाईची शंभरी पूर्ण केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.