विनावाहक बस उत्पन्नात दीड लाखांची घट; सातारा आगाराला फटका

विनावाहक बस उत्पन्नात दीड लाखांची घट; सातारा आगाराला फटका
Updated on

सातारा : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेली एसटीची चाके महिनाभरापासून रस्त्यावर धावू लागली आहेत. मात्र, कोरोनाच्या भीतीने प्रवाशांच्या संख्येत घट झाल्याने सातारा आगारातून सुटणारी सातारा-पुणे विनावाहक बसचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात बुडत आहे. सद्य:स्थितीत सातारा आगारातून विनावाहकच्या दररोज सुमारे 15 फेऱ्या होत असून, केवळ 70 ते 75 हजार रुपये एसटी विभागाच्या तिजोरीत जमा होत आहेत. त्यामुळे, एसटी वाहतूक सुरू होउनही विनावाहक बसच्या उत्पन्नात दररोज सुमारे दीड लाखांनी घट होत 
आहे. 

कोरोनामुळे एसटीला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. मागील महिनाभरापासून एसटी वाहतूक सुरू होउनही प्रवाशांअभावी बस मोकळ्या धावताना दिसत आहेत. कोरोनाचा संसर्ग होण्याआधी सातारा आगारातून सातारा-पुणे विनावाहक बसच्या दररोजच्या सुमारे 55 फेऱ्या होत होत्या. त्यामधून विभागाच्या तिजोरीत दररोज सुमारे अडीच लाखांहून अधिक उत्पन्न जमा होत होते. तसेच, साताऱ्यातून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असूनही कोरोनाच्या भीतीने प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरविल्याने सद्य:स्थितीत केवळ 15 फेऱ्या होत आहेत. सातारा आगारातून आधी दररोज 30 मिनिटांनी पुण्याला जाण्यासाठी बस सुरू होती. मात्र, कोरोनामुळे प्रवाशांनी पाठ फिरविल्याने आता एक तासाने फेरी सोडली जात आहे. यामधील बसच्या एका फेरीतून केवळ 20 ते 22 प्रवासी जात असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. 

परराज्यात फेऱ्या सुरू : कोरोनामुळे राज्य सरकारने परराज्यात जाणारी बस वाहतूक बंद ठेवली होती. मात्र, आता परराज्यातील वाहतूक सुरू केल्याने सातारा आगारातून सातारा-विजापूर बस सुरू करण्यात आली आहे. याचबरोबर, राज्यभरातील इतर आगारांतून परराज्यात जाण्यासाठी येणाऱ्या बसच्या फेऱ्या वाढल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले. 

सद्य:स्थितीत सातारा-पुणे विनावाहक बसला प्रवाशांचा प्रतिसाद कमी असूनही फेऱ्या सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत. तसेच मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागातील बसच्या फेऱ्या वाढविण्यात आलेल्या आहेत. याचबरोबर सातारा-बोरिवली ही शिवशाही दररोज दोन तासांनी सुरू ठेवण्यात आली आहे. 

-रेश्‍मा गाडेकर, आगारप्रमुख (कनिष्ठ), सातारा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.