सातारा : जिल्ह्यात पुन्हा एकदा लम्पी आजाराने डोके वर काढल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. जिल्ह्यात लम्पी आजाराने जिल्ह्यातील दोन जनावरांचा मृत्यू झाला असून, २५० हून अधिक जनावरे बाधित आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना राबविल्या जात आहेत.
गेल्या वर्षी जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. जिल्हा पशुसंवर्धन विभाग लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यात यशस्वी झाले, तरी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नुकसानग्रस्तांना आर्थिक मदतही दिली होती. जिल्ह्यात लसीकरणाची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली होती.