“आनंद मरा नही, आनंद मरते नही” शंतनू, तू गेलास, एक वादळ शांत झाले; पण मृत्यूचा एक आनंदोत्स्तव साजरा करून गेलास!
-डॉ. संदीप गजानन श्रोत्री, सातारा
Dr. Shantanu Abhyankar Passed Away : काय बोलू? काय लिहू? शंतनू आज आपल्यात नाही. कधीतरी ही घटना नजीकच्या भविष्य काळात घडणार होतीच. ती १५ ऑगस्ट रोजी घडली. एक वादळ शांत झाले. त्यालाच नव्हे तर सर्व संबंधितांना तशी कल्पना होतीच. त्याचे आयुष्य कमी राहिले होते. त्याचे स्पष्ट विचार होते, ‘आपल्याला फुफ्फुसाचा कर्करोग (Lung Cancer) झाला आहे’, ‘चौथ्या टप्प्यामध्ये असताना त्याचे निदान झाले’.