बगलबच्यांना ठेका हवा असेल म्हणून बिनबुडाचे आरोप : नगराध्यक्षा माधवी कदम

बगलबच्यांना ठेका हवा असेल म्हणून बिनबुडाचे आरोप : नगराध्यक्षा माधवी कदम
Updated on

सातारा : बगलबच्यांना कोणता तरी ठेका हवा असेल किंवा तो मिळाला नसेल, त्यामुळे नगरसेवक वसंत लेवे बिनबुडाचे आरोप करत आहेत. गंभीर आरोप करण्यापूर्वी पुरावे सादर करावेत व पार्टीच्या नियमानुसार वर्तन ठेवावे, असे आवाहन नगराध्यक्षा माधवी कदम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. सातारा पालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये सातारा विकास आघाडीचे नगरसेवक लेवे यांनी त्यांच्याच आघाडीच्या कारभारावर ताशेरे ओढत भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. 

त्याला नगराध्यक्षांनी नुकतेच उत्तर दिले आहे. याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, की कोणतेही आरोप करण्यापूर्वी लेवे यांनी माहिती घेणे आवश्‍यक होते. ते स्वत: सभापती होते. त्यामुळे त्यांना कामाची पद्धत माहीत आहे. माहिती मिळाली नसती तर त्यांनी माझ्याकडे तक्रार करून शहानिशा करणे आवश्‍यक होते. त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाला कोणताही आधार नाही. 

त्यांच्या बगलबच्यांना हस्ते परहस्ते कोणता ठेका पाहिजे असेल किंवा तो मिळाला नसेल म्हणूनच ते तथ्यहीन आरोप करत असावेत. बेफाम आरोप करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांना स्वत:चे मुसळ दिसत नाही; पण दुसऱ्याचे कुसळ लगेच दिसते. स्वत:च्या कामात त्यांना काही चूक किंवा बेकायदेशीर वाटत नाही. मात्र, दुसऱ्याच्या कामात सर्व चुकाच आहेत असा भास होतो. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.