Krishna Factory Election : सत्तेसाठी एकत्र येणाऱ्यांचा हेतू उघड

Krishna Factory Election
Krishna Factory Electionesakal
Updated on

कऱ्हाड (सातारा) : कृष्णा कारखाना इथल्या सामान्य शेतकऱ्यांच्या (Farmers) हितासाठी काम करणारी संस्था आहे. पण, संस्थेच्या वाटण्या करायला निघालेले भागीभोगट चार महिन्यांपासून सत्तेसाठी एकत्र येण्याचा प्रयत्न करत होते. त्यातून बड्या नेत्यांनी हात काढून घेतले आहेत. त्यामुळे स्वार्थासाठी एकटवणारी कुटिल वृत्ती व त्यांचा हेतू सर्वांसमोर आला आहे. त्यांना ‘कृष्णा’चे सभासद चांगलाच धडा शिकवतील, असे प्रतिपादन यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे (Yashwantrao Mohite Krishna Co-operative Sugar Factory) माजी अध्यक्ष मदनराव मोहिते (Madanrao Mohite) यांनी केले. (Madanrao Mohite Criticizes The Opposition Over The Krishna Factory Election Satara Political News)

Summary

सहा वर्षात अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी कृष्णा कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने चालविला आहे. तो चालविण्याची धमक फक्त सुरेशबाबांमध्येच आहे.

रेठरे बुद्रुक येथे कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत (Krishna Factory Election) सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या (Jayawantrao Bhosale Co-operation Panel) प्रचाराचा श्री. मोहिते यांच्या हस्ते प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, युवा नेते अतुल भोसले, कारखान्याचे संचालक संजय पाटील, जिल्हा परिषद सदस्या श्यामबाला घोडके, सरपंच सुवर्णा कापूरकर, सोसायटीचे अध्यक्ष व्ही. के. मोहिते उपस्थित होते. श्री. मोहिते म्हणाले, 'सहा वर्षात अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी कृष्णा कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने चालविला आहे. तो चालविण्याची धमक फक्त सुरेशबाबांमध्येच आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली कारखाना आणखी प्रगती करेल, याचा विश्वास असल्यानेच सहकार पॅनेलच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. काही लोक आमच्यात लावालावी करण्याचा उद्योग करतील. अफवा पसरवतील. पण, कुठल्याही अफवांना बळी न पडता सभासदांनी डॉ. सुरेशबाबांच्या आणि सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी उभे राहावे.'

Krishna Factory Election
कोरोना तपासणी नाकारल्यास कारवाई करा; गृहराज्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना सक्त आदेश

अध्यक्ष डॉ. भोसले म्हणाले, ‘‘आम्ही शेतकऱ्यांना सरासरी ३००० रुपयांहून अधिक ऊसदर दिला. सहा वर्षे ६० किलो मोफत साखर दिली. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी जयवंत आदर्श ऊसविकास योजना राबविली. आम्ही पारदर्शकपणे व प्रामाणिकपणे काम केले आहे. त्याला बळ देण्यासाठी सर्वांनी खंबीरपणे सहकार पॅनेलच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहावे.’’ अतुल भोसले म्हणाले,‘‘ सभासदांचा मोठा विश्वास सुरेशबाबांच्या नेतृत्वावर आहे. सभासदांच्या हितासाठी आमचे संचालक मंडळ नि:स्वार्थीपणे काम करत असून, अशा प्रामाणिक नेतृत्वाला बळ देण्यासाठी सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे.’’

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात ठेवणं ही जिल्हावासियांची जबाबदारी : शेखर सिंह

Madanrao Mohite Criticizes The Opposition Over The Krishna Factory Election Satara Political News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.