पांढऱ्या रंगाच्या चवर या फुलांनी कास पठार बहरले आहे. काही ठिकाणी त्याचे गालिछे पाहायला मिळत आहेत.
कास : जिल्ह्यातील पर्यटनाचा (Mahabaleshwar Tourism) केंद्रबिंदू, जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पुष्प पठारावर (Kaas Plateau) नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांच्या कळ्या उमलण्यास प्रारंभ होऊ लागला आहे. पांढऱ्या रंगाची रानहळद पठारावर बहरली आहे. त्यांच्या जोडीला इतर फुलेही दिसू लागल्याने सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला कासचा फुलोत्सव अगदी तोंडावर आला आहे.