नगराध्यक्षा त्यांच्या फायद्याचे ठराव करून घेतात; 'त्या' 12 नगरसेवकांचा पलटवार

नगराध्यक्षा त्यांच्या फायद्याचे ठराव करून घेतात; 'त्या' 12 नगरसेवकांचा पलटवार
Updated on

महाबळेश्वर : नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा करून ठराव केला जातो. तो नंतर बदलून नगराध्यक्षांच्या फायद्याचे ठराव करून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला जातो. हा आमचा अनुभव आहे, तसा प्रकार होऊ नये म्हणून आम्ही ऑनलाइन सभेला विरोध केल्याची माहिती उपाध्यक्ष अफजल सुतार व त्यांच्या सहकारी नगरसेवकांनी दिली.
 
नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार पालिकेची ऑनलाइन सभा आयोजिली होती. या सभेला पालिकेतील 12 नगरसेवकांनी विरोध केल्यामुळे ही सभा तहकूब करण्याचा निर्णय नगराध्यक्षांना घ्यावा लागला. सभा तहकूब झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना नगराध्यक्षा यांनी ऑनलाइन सभेला विरोध करणाऱ्या 12 नगरसेवकांच्या भूमिकेवर टीका केली होती. नगराध्यक्षा शिंदे यांनी 12 नगरसेवकांवर केलेल्या आरोपाचे खंडन उपनगराध्यक्ष व त्यांचे सहकारी नगरसेवकांनी केले.

प्रतापगडाच्या तटबंदीसाठी सह्याद्री धावला! 

उपनगराध्यक्ष सुतार म्हणाले, ""आम्ही सर्व प्रथम महाबळेश्वरच्या जनतेची माफी मागतो. ज्या अपेक्षेने पालिकेच्या नेतृत्वासाठी आम्ही नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडला. त्यांनी चार वर्षांत जनतेच्या अपेक्षा तर पूर्ण केल्या नाहीत. उलट विकासाचे गाजर दाखवून पालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला. कोरोना काळात अव्वाच्या सव्वा दराने औषधांची खरेदी केली. कर्मचाऱ्यांच्या जेवणावर लाखो रुपये खर्च केला. आमचा विरोध असतानाही मोठ्या प्रमाणावर घरपट्टी दरात वाढ करून जनतेवर जिझिया कर लादला. पाणी दरात वाढ केली.

सातव्या राणीच्या कथित पुत्राने दाखविले सात तारे; व्यावसायिकाला सव्वा कोटीचा गंडा

पालिकेच्या गाळ्यांचे भाडे वाढविले. पथारी व टपरी धारकांवरही आर्थिक बोजा वाढविला. अशा प्रकारे शहरातील प्रत्येक घटकाला नगराध्यक्षांनी या चार वर्षांत वेठीला धरले. शहराचा विकास करण्याऐवजी त्यांनी आपल्या कुटुंबाचा विकास करण्याला प्राधान्य दिले, हे शहरातील जनता पाहात आहे. त्यामुळे भविष्यात जनता तुमचीच जागा तुम्हाला दाखवून देईल.'' या वेळी नगरसेवक प्रकाश पाटील, नासीर मुलाणी, किसनराव शिंदे, रवींद्र कुंभारदरे आदी उपस्थित होते.

कोरोना काळात नगरसेवकांचे गलिच्छ राजकारण; ऑनलाइन सभेला 12 नगरसेवकांचा विरोध

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.