कऱ्हाड - विधानसभा निवडणुकीसाठीची मतदार यंत्रे आणि त्यासाठी नेमलेले कर्मचारी मतदान केंद्रावर नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात एसटी बसची मदत घेण्यात आली आहे. त्यामुळे एसटीची प्रवासी सेवा सायंकाळपर्यंत पूर्णतः कोलमडली होती. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. अनेक तास प्रवाशांना बसस्थानकातच अडकून पडावे लागले. दरम्यान एसटी बस नसल्याने प्रवाशांना नाइलाजाने खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला.