Prithviraj Chauhan: पृथ्वीराज चव्हाणांचा भाजप करणार गेम? विधानसभेसाठी भाजपचे डाव होत आहेत यशस्वी

Vidahsabha 2024: कऱ्हाड दक्षिणची राजकीय समिकरणे बदलाताहेत , कॉंग्रेसपुढे बालेकिल्ला राखण्याचे आव्हाण
Prithviraj Chauhan: पृथ्वीराज चव्हाणांचा भाजप करणार गेम? विधानसभेसाठी भाजपचे डाव होताहेते यशस्वी
Prithviraj Chauhansakal
Updated on

Maharashtra Politics: सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड दक्षिण म्हणजे कॉंग्रेस आणि कॉंग्रेस म्हणजेच कऱ्हाड दक्षिण अशी मतदार संघाची ओळख जेष्ठ नेते (कै) यशवंतराव चव्हाण, माजी सहकारमंत्री (कै) विलासराव पाटील-उंडाळकर आणि माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आजअखेर राखली आहे.

ती परंपरा खंडीत करण्यासाठी अतुल भोसलेंकडून भाजपच्या माध्यमातुन प्रयत्न सुरु आहेत. सातारा जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच उदयनराजे भोसलेंच्या रुपाने भाजपचा खासदार निवडून आला. (Maharashtra Assembly election 2024)

Prithviraj Chauhan: पृथ्वीराज चव्हाणांचा भाजप करणार गेम? विधानसभेसाठी भाजपचे डाव होताहेते यशस्वी
Shivraj Singh Chauhan Portfolio: शिवराज मामा बनणार मोदींचे शरद पवार, कृषी खात्यासह सांभाळणार सर्वाधिक मंत्रालये

भाजपचा खासदार निवडूण येत असेल तर विधानसभा निवडणुकीत कऱ्हाड दक्षिमध्ये भाजपचा उमेदवारही निवडून येईल या इराद्याने भाजपने फिल्डींग लावली आहे. अतुल भोसलेंनी मलकापुर नगरपालिकेतील कॉंग्रेसचे तीन ते चार नगरसेवक गळाला लावुन एक-एक डाव टाकण्यास प्रारंभ केला आहे.

त्यानंतर आता त्यांनी कऱ्हाड शहरातही लक्ष केंद्रीत करुन तेथील मुळे घट्ट करण्याची मोहिम हाती घेतली आहे. भाजपचे एक-एक डाव यशस्वी होत असल्याने कॉंग्रेसपुढे बालेकिल्ला राखण्याचे मोठे आव्हाण यापुढील काळात असणार आहे.

Prithviraj Chauhan: पृथ्वीराज चव्हाणांचा भाजप करणार गेम? विधानसभेसाठी भाजपचे डाव होताहेते यशस्वी
Madhya Pradesh चं ठरलं, shivraj singh chauhan यांचा पत्ता कट Mohan Yadav मुख्यमंत्री होणार

सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड दक्षिण मतदार संघ हा पहिल्यापासुन आजअखेर कॉंग्रेसच्या विचारांचा राखण्यात नेत्यांना यश आले आहे. या मतदार संघाचे आत्तापर्यंत फक्त यशवंतराव मोहिते, विलासराव पाटील-उंडाळकर आणि पृथ्वीराज चव्हाण या तीनच नेत्यांनी नेतृत्व केले. सातारा जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघापैकी कऱ्हाड दक्षिण हा एकमेव कॉंग्रेसचा मतदार संघ आहे.

त्या मतदार संघावर वर्चस्व ठेवण्यासाठी आमदार चव्हाण यांनी प्रयत्न केले आहेत. त्यांना अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या रयत संघटनेचीही साथ मिळाली आहे. सातारा जिल्हा बॅंकेतील राजकारणानंतर आमदार चव्हाण आणि अॅड. उंडाळकर गटाने बाजार समितीची निवडणुक एकत्रीत निवडणुक सत्ता ताब्यात ठेवली.( will Prithviraj Chavan loss in Karad Vidhan Sabha constituency)

त्यानंतर खऱ्या आर्थाने या दोन्ही गटांचे एकदिलाने काम सुरु झाले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीकडुन खासदार उदयनराजे भोसले आणि महाविकास आघाडीकडुन आमदार शशिकांत शिंदे हे निवडणुक रिंगणात होते. जेष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण यांनी सातारा जिल्हा कोणत्याही परिस्थितीत जातीयवादी पक्षाच्या ताब्यात द्यायचा नाही असे धोरण घेवुन एकदिलाने प्रचार केला. निवडणुकीदरम्यान आमदार शिंदेच निवडून येणार अशी चर्चा होती.

Prithviraj Chauhan: पृथ्वीराज चव्हाणांचा भाजप करणार गेम? विधानसभेसाठी भाजपचे डाव होताहेते यशस्वी
Congress : काँग्रेस भवनात काँग्रेसच्या कार्यकर्त्याला मारहाण

त्यांनी मतमोजणीच्या १४-१५ व्या राऊंडदरम्यान बाजीही मारली. मात्र त्यानंतर त्याचे मताधिक्य कमी झाले आणि महायुतीचे खासदार भोसले हे निवडून आले. या विजयात कऱ्हाड दक्षिणने चांगलीच बाजी मारुन मागील निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तत्कालीन उमेदवार माजी खासदार श्रीनिवास पाटील यांना मिळालेले ३० हजारहुन अधिक मते कमी करुन ६१६ मते अधिक मिळवण्यात यश मिळवले.

त्यासाठी भाजपचे अतुल भोसले यांनी सर्व शक्ती पणाला लावली होती. कऱ्हाड दक्षिण हा मतदार संघ कॉंग्रेसचा बालेकिल्ला असुनही तो भाजपच्या उमेदवाराला प्लस झाल्याने अतुल भोसलेंसह भाजपच्या नेत्यांचा विश्वास दुणावला आहे. त्यांनी आता यावेळी विधानसभा जिंकायचीच असा निर्धार करुन त्यादृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

.........................

कॉंग्रेसकडून कारणे शोधत विधानसभा तयारी

सातारा लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे मताधिक्य कमी झाले. त्याचबरोबर भाजपच्या उमेदवाराला दक्षिणमधुन ६१६ अधिक मते मिळाली. त्याचा कॉग्रेसलाही धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण यांनी हे अनपेक्षीत असल्याचेही सांगतले आहे.

दरम्यान कॉंग्रेसने कऱ्हाड दक्षिणमधील मते कशी कमी झाली, भाजपच्या उमेदवाराचे मताधिक्य कसे वाढले, कोणत्या गावात काय झाले याची कारणमिमांसा करण्याचे काम सुरु केले आहे. माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण, कॉंग्रेसचे दक्षिणचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांनी त्यासाठी प्रत्येक पंचायत समिती गणातील नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी, प्रमुख पदाधिकारी यांच्याशी चर्चा करुन नेमकी कारणे शोधण्यास सुरुवात केली आहे. त्यातुनही त्यांची विधानसभेची तयारी सुरु आहे.

............................

Prithviraj Chauhan: पृथ्वीराज चव्हाणांचा भाजप करणार गेम? विधानसभेसाठी भाजपचे डाव होताहेते यशस्वी
Congress Meeting : काँग्रेस वर्किंग कमिटीची आज बैठक; संसदीय समितीच्या नेतेपदासाठी 'या' नेत्याचं नाव होणार फायनल?

भोसलेंचा मलकापुरनंतर कऱ्हाडवर लक्ष

विधानसभा आणि मलकापुर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपचे नेते अतुल भोसले यांनी आता एक-एक डाव टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याला यशही येत असल्याचे दिसत आहे. त्यांनी कॉंग्रेसचे खंदे समर्थक आणि आमदार चव्हाण व कऱ्हाड दक्षिण कॉंग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांचे विश्वासु सहकारी राजेंद्र यादव व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी थेट भाजपमध्येच घेवुन ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातुन मलकापुरमध्ये भाजपची ताकद चांगलीच वाढणार असुन तो कॉंग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. राजेंद्र यादव यांचा मलकापुर व परिसरात चांगला प्रभाव आहे.

त्याचा फायदा भोसले यांना विधानसभा निवडणुकीसाठीही नक्कीच होईल. त्याचबरोबर आता भोसले यांनी कऱ्हाड शहरावरही फोकस करुन तेथेही फासे टाकण्यास सुरुवात केली आहे. लवकरच काही नवीन चेहरे भाजपमय होतील असे त्यांचे म्हणने आहे. आगामी विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर त्यांची ही खेळी भाजपसाठी महत्वपुर्ण ठरणार आहे.

Prithviraj Chauhan: पृथ्वीराज चव्हाणांचा भाजप करणार गेम? विधानसभेसाठी भाजपचे डाव होताहेते यशस्वी
Pune Loksabha Congress : काँग्रेसवर ‘हाता’ने अपयशाची वेळ

अशोकराव थोरात कॉंग्रेसच्या वाटेवर ?

माजी सहकारमंत्री (कै) विलासराव पाटील-उंडाळकर यांनी कऱ्हाडला पहिल्यांदा कृषी प्रदर्शन सुरु केले. त्याची जबाबदारी त्यांनी शेतीमित्र अशोकराव थोरात यांच्यावरुन दिली होती. त्यावेळपासुन त्यांची चांगली ओळख निर्माण झाली. मलकापुर ग्रामपंचायत असताना त्यांनी अनेक काळ मलकापुरची सत्ता ताब्यात ठेवली होती. त्यानंतर त्यांनी मळाईदेवी शिक्षण संस्था, मळाईदेवी पतसंस्था, अॅथलेटिक्स असोशिएशन, शिक्षण संस्थाचालक महामंडळ आदि माध्यमातुन आपले काम सुरु ठेवले आहे. त्यानंतर त्यांनी उंडाळकर गट सोडुन भाजपचे अतुल भोसले यांच्या गटाशी जवळीक केली.

ते अतुल भोसले यांचे निकटवर्तीय म्हणुन परिचीत आहेत. मध्यंतरी त्यांनी कृष्णा साखर कारखान्याच्या कृष्णा कृषी परिषदेचे अध्यक्षपद भुषवले होते. त्याचबरोबर त्यांचा पुतण्या मलकापुर पालिकेच्या निवडणुकीत भोसले यांच्या पॅनेलमधुन नगरसेवक म्हणुन निवडुन आला होता. थोरात यांची राजकीय परिस्थिती अशी असताना त्यांनी नुकतीच कॉंग्रेस पक्षाच्या अनुसुचीत सेलने आयोजीत केलेल्या मेळाव्यात उपस्थिती लावुन मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाविरोधात मते मांडली. त्यामुळे ते आता कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याचीही चर्चा आहे.

Prithviraj Chauhan: पृथ्वीराज चव्हाणांचा भाजप करणार गेम? विधानसभेसाठी भाजपचे डाव होताहेते यशस्वी
Congress: या मतदारसंघात काँग्रेस करतंय चक्क 'नोटा'चा प्रचार, काय आहे कारण?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.