सातारा : ग्रामपंचायतींना 14 व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याची मुदत 31 मार्च 2020 पर्यंत होती. मात्र, सद्यःस्थितीतील कोरोनाच्या संकटामुळे अखर्चित निधीला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली असून, हा निधी 31 मार्च 2021 पर्यंत खर्च करण्यास ग्रामपंचायतींना परवानगी देण्यात आली आहे.
मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाउनची स्थिती उद्भवलेली होती. या काळात ग्रामपंचायतींनी कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्यविषयक विविध उपाययोजना केल्या होत्या. यासाठी ग्रामपंचायतींनी 14 व्या वित्त आयोगाचा निधी खर्च केला होता. मात्र, सध्याची परिस्थिती पाहून शिल्लक रक्कम खर्च करण्यास मुदतवाढीसह परवानगी देण्यात आली आहे.2019-20 मध्ये 31 मार्चपूर्वी 90 टक्क्यांहून अधिक अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.
पुस्तक दानातून वाचनसंस्कृतीला बळ : प्रदीप विधाते
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये स्वच्छता, विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्जंतुकीकरण, औषध फवारणी, सांडपाण्याचा निचरा आदीवर भर देण्यात येणात आहे. कोरोनासंबंधी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणारी शाळेची इमारत, महाविद्यालये, अंगणवाडी, दवाखाने, ग्रंथालये, पंचायत भवन, बाजारपेठा आदी ठिकाणी उपाययोजना करण्याची गरज आहे. कचराकुंडीची सफाई करून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, मास्क, हातमोजे, सॅनिटायझर, गम बूट आदी सुविधा ग्रामपंचायत स्तरावरील स्वयंसेवकांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना शासनाने केलेल्या आहेत.
चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीला 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये वित्त आयोगातील निधीच्या मुदतवाढीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्जंतुकीकरण, मास्क, सॅनिटायझर खरेदीला प्राधान्य देण्यात येणार आहे.
- अविनाश फडतरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.