Police Bharti 2024 : 'इतक्या' पदांसाठी साताऱ्यात उद्यापासून पोलिस भरती; तब्बल एक लाखांहून अधिक उमेदवारांनी भरला अर्ज

पोलिस दलातील विविध पदांसाठी तब्बल एक लाख तीन हजार ३० उमेदवारांनी अर्ज भरला आहे.
Satara Police Bharti
Satara Police Bhartiesakal
Updated on
Summary

शेख म्हणाले, ‘‘पोलिस दलात २३५ पदांमध्ये ३९ पदे ही चालक पदासाठी, तर पोलिस कॉन्स्टेबल व बँड वादकांसाठी एकूण १९६ पदे आहेत.''

सातारा : जिल्हा पोलिस दलाच्या वतीने (Satara Police Force) २३५ पदांसाठी बुधवारपासून (ता. १९) भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून ते सायंकाळी उशिरापर्यंत भरती (Satara Police Bharti) प्रक्रिया येथील पोलिस कवायत मैदानावर सुरू राहणार आहे. पोलिस दलातील विविध पदांसाठी तब्बल एक लाख तीन हजार ३० उमेदवारांनी अर्ज भरल्याची माहिती आज पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Satara Police Bharti
अण्‍णासाहेब पाटील महामंडळाच्या 61 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; नरेंद्र पाटील संतप्त, मुख्‍यमंत्र्यांना विचारणार जाब

शेख म्हणाले, ‘‘पोलिस दलात २३५ पदांमध्ये ३९ पदे ही चालक पदासाठी, तर पोलिस कॉन्स्टेबल व बँड वादकांसाठी एकूण १९६ पदे आहेत. उमेदवारांनी ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्याची प्रवेशपत्र त्यांना तत्काळ दिले जाणार असून, शैक्षणिक कागदपत्रे तपासण्यासाठी चार टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. शैक्षणिक प्रमाणपत्रांचे दोन छायांकित संच, सहा पासपोर्ट साईज फोटो व जात प्रमाणपत्र या भरतीसाठी अनिवार्य आहे.

तसेच उमेदवारांनी साताऱ्यासह अन्य जिल्ह्यांमध्ये प्रवेश भरतीसाठी अर्ज केला असल्यास व एकाच दिवशी अन्य ठिकाणची मैदानी चाचणी असल्यास त्या उमेदवारांना दुसरी तारीख देण्यात येईल. कागदपत्रांची छाननी त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी, तसेच १६०० मीटर धावणे, १०० मीटर धावणे व गोळाफेक अशा निकषांमधून पार पडलेल्या उमेदवारांची पोलिस दलाच्या संकेतस्थळावर गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

Satara Police Bharti
'OBC आरक्षणाबाबत उद्याच कॅबिनेट बैठकीत चर्चा'; सरकारच्या शिष्टमंडळाचं आंदोनकर्त्या लक्ष्मण हाकेंना मोठं आश्वासन

...तर उमेदवारास दुसरी तारीख मिळणार

उमेदवारांनी साताऱ्यासह अन्य जिल्ह्यांमध्ये प्रवेश भरतीसाठी अर्ज केला असल्यास व एकाच दिवशी अन्य ठिकाणची मैदानी चाचणी असल्यास त्या उमेदवारांना दुसरी तारीख देण्यात येईल.

युवकांच्या निवासाची सोय

भरतीसाठी येणाऱ्या युवकांना राहण्याची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. त्यासाठी पोलिस करमणूक केंद्राचा हॉल, शाहू स्टेडियम या ठिकाणी मैदानी चाचणीच्या एक दिवस अगोदर निवासाची सोय करण्यात आली आहे. पोलिस दलाने केलेल्या या उपाययोजनेमुळे गरजू मुलांची गैरसोय दूर होणार आहे.

Satara Police Bharti
डॉ. आंबेडकरांच्या जीवनावर सर्व भाषिक काव्यरचना ग्रंथ प्रकाशित होणार; साहित्यिकांना काव्यरचना पाठवण्याचं 'बार्टी'चं आवाहन

ही पदे भरली जाणार...

  • चालक : ३९

  • पोलिस कॉन्स्टेबल व बँड वादक : १९६

आवश्‍यक कागदपत्रे

  • शैक्षणिक प्रमाणपत्रांचे दोन छायांकित संच

  • सहा पासपोर्ट साईज फोटो

  • जात प्रमाणपत्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.