सातारा : कोरोनाचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात कडक (Corona Lockdown) निर्बंध लावण्यात आले होते. मात्र, आता महाराष्ट्र राज्यातील (Maharashtra Unlock) अनलॉकबाबत आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशाची अंमलबजावणी पुढील आठवड्यात होणार आहे. राज्यात सोमवारपासून अनलॉक प्रक्रिया सुरु होणार असून कोरोना पॉझिटिव्हीटी रेटनुसार पाच टप्प्यांमध्ये 'अनलॉक' होणार आहे. दरम्यान, राज्यात अनलॉक प्रक्रियेसाठी 5 टप्पे तयार करण्यात आले असून तिसऱ्या टप्प्यात सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह अन्य जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. (Maharashtra Unlock Third Phase Includes Satara Kolhapur Sangli And Solapur District Satara Marathi News)
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले होते. मात्र, आता महाराष्ट्र राज्यातील अनलॉकबाबत आदेश जारी करण्यात आला आहे.
मागील वर्षापासून देशात कोरोनानं थैमान माजवायला सुरुवात केली, त्यामुळे देशातील बहुतांश राज्यात कडक लाॅकडाउन सुरु करण्यात आला होता. मात्र, जसजसा कोरोना कमी होत आहे, तसतसे अनेक राज्यांनी लाॅकडाउन उठवायला सुरुवात केलीय. शासनाने मध्यरात्री जाहीर केलेल्या नियमावलीमध्ये राज्यातील पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात 5 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. तिसऱ्या टप्प्यात 10 जिल्ह्यांचा समावेश आहे, तर चौथ्या टप्प्यात फक्त 2 जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढल्यास पाचव्या स्तरात संबंधित जिल्ह्याचा समावेश केला जाईल, असे या नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.
तिसऱ्या टप्प्यात 'या' जिल्ह्यांचा समावेश
सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर यांसह अकोला, बीड, उस्मानाबाद, पालघर या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे.
Maharashtra Unlock Third Phase Includes Satara Kolhapur Sangli And Solapur District Satara Marathi News
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.