'...तर मविआच्या उमेदवाराचा 74 हजारांच्या मताधिक्याने पराभव झाला असता, तोंड दाखवायलाही जागा उरली नसती'

RPI President Rajendra Gawai : येत्या निवडणुकीत सातारा जिल्ह्यात ८० हजार मते घेऊन दाखवू, असे आव्हानही गवई यांनी दिले.
RPI President Rajendra Gawai
RPI President Rajendra Gawaiesakal
Updated on
Summary

''आम्ही आमच्या अस्तित्वासाठी लढत आलो आहे. भाजपबरोबर गेलो नाही. मात्र, आठवले गेले. जातीयवाद्यांना हद्दपार करण्याचा ठेका केवळ आम्ही घेतला नाही.''

कोरेगाव : सातारा लोकसभा मतदारसंघाच्या (Satara Lok Sabha Constituency) निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय गाडे यांच्या ‘एबी’ फॉर्ममध्ये स्वतः माझ्याकडून चूक झाली नसती, तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा ३७ हजार नव्हे, तर ७४ हजारांच्या मताधिक्याने पराभव झाला असता आणि तोंड दाखवायला जागा उरली नसती, असा टोला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष राजेंद्र गवई (Rajendra Gavai) यांनी लगावला.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा निर्धार मेळावा येथील जितराज मंगल कार्यालयात झाला. त्या वेळी श्री. गवई बोलत होते. या वेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमारे, पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांत कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय गाडे, जिल्हा प्रभारी हेमंत भोसले, कोरेगाव तालुकाध्यक्ष प्रशांत उबाळे, पुणे शहराध्यक्ष रवींद्र कांबळे, सातारा जिल्हा युवा आघाडीचे अध्यक्ष विशाल कांबळे, महाबळेश्वर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, विद्यार्थी आघाडीचे आशुतोष वाघमोडे, प्रशांत वाडकर आदी उपस्थित होते.

RPI President Rajendra Gawai
'या' महालक्ष्मी बँकेत कर्मचाऱ्यांनी केला तब्बल 75 कोटींचा घोटाळा; 82 कोटींचे कर्ज वितरण केले अन्..

साताऱ्यातील आमच्या उमेदवाराला मिळालेली मते ही ‘तुतारी’मुळे मिळाली आहेत, असे म्हणणाऱ्यांना सांगतो, की आमचा एबी फॉर्म चुकला नसता, तर तुमचा ३७ नव्हे ७४ हजार मतांनी पराभव होऊन तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरली नसती. अजून वेळ गेलेली नाही. जातीयवाद्यांना हद्दपार करण्याचा मक्ता केवळ आम्ही घेतला नाही. विषाची परीक्षा घ्यायची असेल, तर अजून घ्या. येत्या निवडणुकीत सातारा जिल्ह्यात ८० हजार मते घेऊन दाखवू, असे आव्हानही श्री. गवई यांनी दिले.

RPI President Rajendra Gawai
Police Raid on RSS Office : आरएसएस कार्यालयावर पोलिसांचा छापा; संघटनेच्या अनेक प्रचारकांना अटक, काय आहे कारण?

आम्ही कधीही जातीयवाद्यांशी हातमिळवणी केलेली नाही. इतिहासात जाऊन पाहिले तरी अगदी दादासाहेब गायकवाड असतील, त्यानंतर रा. सु. गवई असतील, तरीही आमच्यावर राष्ट्रवादीच्या एका नेत्यांनी ‘बी’ टीम म्हणून टीका केली. मात्र, आम्ही आमच्या अस्तित्वासाठी लढत आलो आहे. भाजपबरोबर गेलो नाही. मात्र, आठवले गेले. जातीयवाद्यांना हद्दपार करण्याचा ठेका केवळ आम्ही घेतला नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. आमच्याकडे दुर्लक्ष झाल्यास आम्ही आमचा काय तो निर्णय घेऊ. आगामी विधानसभेत ती चूक पुन्हा होऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला.

जिल्ह्यातील चार उमेदवार जाहीर

सातारा जिल्ह्यातून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने कोरेगावातून चंद्रकांत कांबळे, वाईतून सुहास मोरे, फलटणमधून ॲड. पायल गाडे- जगताप व कऱ्हाड दक्षिणमधून संजय गाडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.