कोपर्डे हवेली (जि. सातारा) : सप्टेंबर 2020 पर्यंतच्या वीजबिलात 50 टक्के सवलत दिली असून शेतकऱ्यांनी मार्च अखेरपर्यंत वीजबिले भरून संपूर्ण सवलतीचा फायदा घ्यावा. त्यानंतरच्या वीजबिलास सवलत नाही. चालू बिले मुदतीत भरली नाहीत, तर नाईलाजास्तव वीज कनेक्शन बंद करावी लागतील, अशी माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता अभिमन्यू राख यांनी दिली.
शेतीपंपांच्या वीजबिलासंदर्भातील बैठकीत ते येथे बोलत होते. शेतकऱ्यांच्या सोयीनुसार एक दिवस महावितरणचे बिलिंग कर्मचारी गावात येऊन बिले दुरुस्त करून देतील, असेही त्यांनी नमूद केले. अतिरिक्त कार्यकारी अभियंता नवाळे, शाखा अधिकारी बद्रायणी, प्रधान तंत्रज्ञ सय्यद, शेतकरी सुदाम चव्हाण, लालासाहेब पाटील, संजय चव्हाण, सुनील चव्हाण, संदीप चव्हाण, हिम्मत चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते.
श्री. राख म्हणाले, ""सप्टेंबर 2020 पर्यंतचे वीजबिलास 50 टक्के सवलत आहे. ही योजना 2023 पर्यंत चालू राहील. शेतकऱ्यांनी मार्च अखेरपर्यंत वीजबिले भरून संपूर्ण सवलतीचा लाभ घ्यावा.'' यावेळी शेतकरी भास्कर चव्हाण यांनी शेतकऱ्यांना वीजबिले वेळच्या वेळी मिळावीत, अशी मागणी केली.
चुकीच्या पद्धतीने वसुली केल्यास अधिकाऱ्यांना काळे फासू; बळीराजाचा महावितरणला कडक इशारा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.