ढेबेवाडी (सातारा) : ढेबेवाडीसह सातारा, कऱ्हाड परिसरात कालपासून पावसाने जोर (Heavy Rainfall) धरल्याने वांग नदीवरील (Wang River) महिंद धरण (Mahinda Dam) ओव्हरफ्लो झाले आहे. धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असले, तरी २१ वर्षांपासून या धरणात साचलेला गाळ तसाच पडून असल्याने त्यात नेमका पाणीसाठा किती..? याचे नेमके उत्तर पाटबंधारे विभागाकडेच (Department of Irrigation) नाही. डोंगरातून नदी, नाले व ओढ्यातून मोठ्या प्रमाणात वाहून येणाऱ्या पाण्यामुळे पावसाळ्याच्या सुरवातीच्या टप्प्यातच महिंद धरण ओव्हर फ्लो होते. (Mahinda Dam Overflow At Dhebewadi Satara Rain News)
ढेबेवाडी परिसरात कालपासून पावसाने जोर धरल्याने वांग नदीवरील महिंद धरण ओव्हरफ्लो झाले आहे.
ढेबेवाडी खोऱ्यातील अनेक गावांच्या शेती व पिण्याच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न या धरणामुळे सुटला असून, पावसाळ्यात धरण भरतेय कधी, याकडेच येथील जनतेचे लक्ष लागलेले असते. ८५ दशलक्ष घनफूट क्षमतेच्या महिंद धरणाचे पाणलोट क्षेत्र ३५.९८ चौरस किलोमीटरचे असून, ३६२ हेक्टर क्षेत्र त्यामुळे लागवडीखाली आलेले आहे. गेल्या वर्षी आणि यंदाही पावसाळ्याच्या तोंडावर झालेल्या वादळी पावसाने धरण भरायला बराच हातभार लावल्याने सलग दुसऱ्याही वर्षी ते लवकर भरले आहे.
धरणाच्या १०४ मीटरच्या मुक्तपतन पद्धतीच्या सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे. मध्यंतरी धरणाच्या दगडी सांडव्याची पडझड झाल्याने धरणाला निर्माण झालेला धोका जॅकेटिंग केल्याने हटला आहे. या उन्हाळ्यात धरणाच्या सांडव्याजवळ निदर्शनास आलेले मोठे भगदाड नुकतेच पाटबंधारे विभागाने बुजविले आहे. सध्या धरण ओव्हरफ्लो असले, तरी त्यात प्रत्यक्षात पाणीसाठा किती? याचे नेमके उत्तर पाटबंधारे विभागाकडेही नाही, कारण गेल्या २१ वर्षांत धरणात मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ काढण्यासाठी वारंवार नियोजन केले जात असले, तरी अद्याप गाळ निघालेलाच नाही. गेल्या वर्षी धरणाजवळची संरक्षक भिंत जमीन खचून कोसळली मात्र अद्यापही तिची दुरुस्ती केलेली नाही.
Mahinda Dam Overflow At Dhebewadi Satara Rain News
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.