पुणे-बंगळुरु महामार्गावरील कोल्हापूर नाक्यावरील उड्डाण पुलाखालून शहरात येण्यासाठी गेल्या अनेक वर्षपासून मार्ग होता. मात्र, तो मार्ग महामार्गावरुन शहरात येत होता.
कऱ्हाड : पुणे-बंगळुरु महामार्गावरील (Pune-Bangalore Highway) कऱ्हाडजवळील (जि. सातारा) कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूल पाडण्यात आला. त्यामुळं कऱ्हाड शहरात येण्यासाठी असलेला कोल्हापूर नाक्यावरील (Kolhapur Naka) मार्ग बंद करुन तो पुढे पाटण तिकाटण्यातून करण्यात आला.
त्यामुळं विद्यार्थी, नोरकदार, आबालवृद्द नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळं नागरिकांची शहरात येण्यासाठी जवळचा मार्ग उपलब्ध करावा, अशी मागणी होती. त्यातच मनसेचे दादा शिंगण यांनी आंदोलनही केले होते. त्याचा विचार करुन पोलिसांनी पुढाकार घेवून शहरात येण्यासाठी जवळचा मार्ग उपलब्ध करुन देण्याच्या सूचना महामार्ग ठेकेदाराला केल्या.
त्यानुसार सध्या शहरात येण्यासाठी कोल्हापूर नाका परिसरातून मार्ग करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. पुणे-बंगळुरु महामार्गावरील कोल्हापूर नाक्यावरील उड्डाण पुलाखालून शहरात येण्यासाठी गेल्या अनेक वर्षपासून मार्ग होता. मात्र, तो मार्ग महामार्गावरुन शहरात येत होता. त्यामुळं त्या मार्गावरुन रस्ता ओलांडताना अनेक अपघात होवून अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
त्याचा विचार करुन कोल्हापूर नाक्यावर उड्डाणपूल करावा, अशी मागणी सातत्यानं होत होती. त्यासंदर्भात सकाळनेही आवाज उठवला होता. लोकप्रतिनिधींनीही त्याची मागणी केली होती. त्याचा विचार करुन महामार्ग विभागाने कोल्हापूर नाक्यावर नवीन उड्डाणपूल करण्याची कार्यवाही सुरु केली. त्याअंतर्गत कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपुल पाडण्यात आला. त्यामुळे कऱ्हाड शहरात येण्यासाठी असलेला कोल्हापूर नाक्यावरील मार्ग बंद करुन तो पुढे पाटण तिकाटण्यातून करण्यात आला.
त्यामुळे विद्यार्थी, नोरकदार, आबालवृध्द नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. त्यातच सध्या पाऊस सुरु असल्याने नागरिकांची, महिलांची, विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय सुरु होती. त्यामुळे कऱ्हाड शहरात येण्यासाठी जवळचा मार्ग उपलब्द करुन द्यावा, अशी मागणी नागरीकांनी केली होती. त्यातच मसनेचे दादा शिंगण यांनी काल आंदोलन करुन तातडीने मार्ग उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती.
त्याचा विचार करुन पोलीस उपाधिक्षक अमोल ठाकूर, कऱ्हाड शहर पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मछले, महामार्ग विभागाचे अधिकारी, ठेकेदार यांनी त्या परिसराची पाहणी केली. त्यानंतर कोल्हापूर नाका परिसरातून मार्ग उपलब्ध करुन देण्यासंदर्भात ठेकेदारांना सूचना केल्या आहेत. त्यानुसार तो मार्ग तयार करण्याची कार्यवाही सुरु असून दोन दिवसांत तो मार्ग सुरु होणार आहे. त्यामुळे वाहनधारकांची चांगली सोय होणार आहे.
कोल्हापूर नाक्याजवळून कऱ्हाड शहरात येण्यासाठी जवळचा मार्ग असावा, अशी सर्वांचीच मागणी होती. त्यापार्श्वभूमीवर शहरात येण्यासाठी त्या परिसरातून मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आठवडाभर त्या मार्गाची ट्रायल घेत आहोत. ती ट्रायल यशस्वी झाल्यावर तो मार्ग पुढे सुरु ठेवण्यात येईल.
-अमोल ठाकुर, पोलिस उपाधिक्षक, कऱ्हाड
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.