बाप्पांच्या विसर्जनासाठी दिवस, वेळेची नोंदणी करा : मलकापूर नगराध्यक्षा नीलम येडगे
मलकापूर (जि.सातारा) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथे "एक नगरपालिका, एक गणपती' या सकारात्मक निर्णयाबरोबर घरगुती गणेशांचे विसर्जन करण्याचा अनोखा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी पालिकेने गणेश विसर्जनाचा "मास्टर प्लॅन' तयार केलेला आहे. शहरातील नऊ प्रभाग अध्यक्षांसह एक नोडल अधिकारी व स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. घरातूनच गणेशाला निरोप देण्यासाठी नागरिकांनी विसर्जनाचा दिवस व वेळेची नोंदणी करावी, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या ट्विटची होतीय चर्चा
दोन दिवसांतच शहरातील 57 मंडळांनी या उपक्रमास उत्स्फूर्त पाठिंबा देत नुकताच "एक नगरपालिका, एक गणपती' हा आदर्श निर्णय सर्वपक्षीय पदाधिकारी, मंडळांनी घेतला. या ऐतिहासिक निर्णयाबरोबरच घरगुती गणेश विसर्जनाचीही पालिकेने जबाबदारी घेतली आहे. कोरोनामुळे यावर्षी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी घरगुती गणपतींचेही विसर्जन करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. यासाठी पालिकेने शहरातील नऊ प्रभागांसाठी नऊ अध्यक्ष, प्रमुख अधिकाऱ्यांपैकी नऊ अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केलेली आहे.
स्वच्छ सर्वेक्षणात कऱ्हाडला 'या' मुळेच देशात पहिला क्रमांक मिळाला : नगराध्यक्षा रोहिणी शिंदे
हे अधिकारी आपापल्या प्रभागातील घरगुती गणेश विसर्जनाच्या तारखेसह वेळेनुसार नियोजन करतील. त्यांच्या जोडीला पाच ते सहा स्वयंसेवकांसह वाहनांचीही व्यवस्थाही करण्यात आली आहे. घरगुती गणेशाचे विधिवत विसर्जन करण्याची जबाबदारी पालिकेने उचलली आहे. नोंदणी करून विसर्जनाचा दिवस ठरवणार आहे. ठरलेल्या दिवशीच विसर्जनाची जबाबदारी पालिकेने घेतलेली आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घरातून गणेशाला निरोप देऊन आपल्या व इतरांच्या आरोग्यासाठी पालिकेच्या उपक्रमात सहभागी व्हावे.
आम्हांला आठ दिवसांचा लॉकडाउन हवाय, व्यापाऱ्यांची मागणी
शहरातील सर्व नागरिकांनी पाचव्या, सातव्या व अनंत चतुदर्शी दिवशी विसर्जनासाठी श्री गणेशमूर्ती व निर्माल्य पालिकेस देवून सहकार्य करावे, यासाठी वरीलप्रमाणे प्रभागनिहाय अध्यक्ष नियुक्त केलेले नोडल अधिकारी तसेच विशेष यंत्रणेचे अधिकारी यांच्याशी अथवा मलकापूर नगरपरिषद कार्यालय, आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभागाशी संपर्क करून "एक नगरपरिषद, एक गणपती' या नगरपरिषद व या नावीन्यपूर्ण उपक्रमास प्रतिसाद नोंदवून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास सहकार्य करावे. नागरिकांनी विसर्जनाचा दिवस व वेळेची नोंदणी करावी, असे आवाहन नगराध्यक्षा नीलम येडगे, उपाध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यासह सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांसह अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे. विसर्जनावेळी गर्दी होऊ नये म्हणून पालिकेने शहरात कृत्रिम जलकुंडांचीही निर्मिती केलेली नाही.
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी 'ही' आधार नोंदणी घेऊन आली नामी संधी
विसर्जनासाठी विहीर आणि खाणी
मलकापुरातील सार्वजनिक व घरगुती गणेशमूर्तींचे जाधव पाणवठा, पाचवडेश्वर व प्रीतिसंगमावर विसर्जन करण्याची परंपरा आहे. यावर्षी मलकापूर पालिकेने पर्यावरणपूरक विधिवत गणेश विसर्जनासाठी स्वतंत्र नियोजन केले आहे. नदी प्रदूषण व गर्दी टाळण्यासाठी पालिकेनेच विसर्जनाची जबाबदारी घेतली आहे. तर विसर्जनासाठी विहीर आणि खाणींचा वापर करण्याचे नियोजन केले आहे.
कॅबिनेटच्या बैठकीत याची चर्चाच नाही, राजू शेट्टींसह राज्यातील आंदाेलकांचा हिरमाेड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.