Prabhakar Gharge : कलेढोणकरांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध : प्रभाकर घार्गे ; मायणी गटातून जास्तीचे मताधिक्य मिळेल

Man-Khatav Vidhan Sabha Election 2024 : (कै.) हणमंतराव साळुंखे व शरदचंद्र भोसले गटाचे आणि माझे चाळीस वर्षांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. पण त्यांच्या पोटात विनाकारण का दुखतंय? असा टोला महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर घार्गे यांनी विरोधकांना लगावला.
Prabhakar Gharge
Prabhakar Gharge sakal
Updated on

कलेढोण : येथील (कै.) हणमंतराव साळुंखे व शरदचंद्र भोसले गटाचे आणि माझे चाळीस वर्षांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मी चंद्रावर असलो, तरी पृथ्वीवरची कामे करतो. तुम्ही बोराटवाडीत राहून मतदारसंघातील कामे करत नाही.

माझं सगळं व्यवस्थित चाललंय; पण त्यांच्या पोटात विनाकारण का दुखतंय? असा टोला महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर घार्गे यांनी विरोधकांना लगावला.

मायणी गटातील विविध गावांत महाविकास आघाडीच्‍या राष्‍ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार म्‍हणून ते बोलत होते.

यावेळी आघाडीचे नेते प्रभाकर देशमुख, सुरेंद्र गुदगे, रणजितसिंह देशमुख, अनिल पवार, सूर्यभान जाधव, संजीव साळुंखे, चंद्रकांत पवार, राजू जुगदर, बाळासाहेब माने, हिम्मतराव देशमुख, विनोद देशमुख, संतोष ढोकळे, मजनू मुलाणी, महेश पाटील, प्रकाश लिगाडे, मारुती दबडे, राजू नायकुडे, मुरलीधर भुसारी, मुरलीधर तरसे आदी उपस्थित होते.

श्री. घार्गे म्हणाले, ‘‘माझ्या जडणघडणीत (कै.) हणमंतराव साळुंखे तात्यांचा मोठा वाटा आहे, तर शरदचंद्र भोसलेंचेही माझे जवळिकीचे संबंध आहेत. खटाव-माण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पडळ साखर कारखाना उभा केला आहे. मे महिन्यात खटाव- माण स्टील कारखाना सुरू केला आहे. वडूजला कोल्ड स्टोरेज सुरू आहे.

वाटोळे केलेला इथेनॉल प्रकल्प पुन्हा सुरू केला आहे. या सर्व प्रकल्पात काम करणाऱ्या लोकांना मी रोजगार दिला आहे. त्यामुळे कोणताही उद्योग न उभा करणाऱ्यांनी माझ्यावर बोलू नये.’’

यावेळी देशमुख म्हणाले, ‘‘शरद पवार यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करून देशाचा शेतकरी जगविला. लोकप्रतिनिधीने पाणी केवळ मीच आणले, असा कांगावा चालवला आहे; पण तसे नाही, हे सर्वांनी लक्षात घ्‍यावे.’’

श्री. गुदगे म्हणाले, ‘‘घार्गे हे स्थानिक व हक्काचा उमेदवार म्हणून रिंगणात उभे आहेत. त्यांना सगळ्याच गावातून चांगले मताधिक्य मिळणार आहे.’’ यावेळी रणजितसिंह देशमुख, हिम्मत देशमुख, संजीव साळुंखे, सूर्यभान जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्‍यान, लक्ष्मणराव माने यांच्या भटक्या विमुक्त संघटनेचे राज्य चिटणीस रामचंद्र जाधव यांनी घार्गेंना पाठिंबा असल्याचे पत्र माजी सभापती चंद्रकांत पवार व राष्ट्रवादीचे गटनेते राजू जुगदर यांना दिले.

दहिवडीत शरद पवारांची सभा...

दहिवडीतील बाजार पटांगणावर उद्या (शनिवारी) दुपारी तीन वाजता महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर घार्गेंच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्‍यक्ष शरद पवार यांची परिवर्तन निर्धार सभा होणार आहे. त्‍यासाठी सर्वांनी उपस्‍थित राहावे, असे आवाहनही यावेळी मान्‍यवरांनी केले.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.