'माणदेशी', स्टेट बॅंक ऑफ इंडिया देतेय उद्योजिकांना कर्ज वाटपातून बळ

'माणदेशी', स्टेट बॅंक ऑफ इंडिया देतेय उद्योजिकांना कर्ज वाटपातून बळ
Updated on

सातारा : माणदेशी फाउंडेशन आणि स्टेट बॅंक ऑफ इंडिया यांच्या वतीने ग्रामीण भागातील महिला उद्योजिकांना कर्ज वाटप उपक्रमाचे नुकतेच उद्‌घाटन करण्यात आले. याप्रसंगी स्टेट बॅंकेचे सीजीएम दीपक कुमार लल्ला, फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा चेतना सिन्हा, बॅंकेचे जनरल मॅनेजर संजय श्रीवास्तव, विनोद कुमार, संदीप मून, फाउंडेशनच्या व्यस्थापकीय अधिकारी वनिता शिंदे, वंदना भोसले, अपर्णा सावंत, सोनाली पवार आदी उपस्थित होते.
 
या कार्यक्रमात प्रातिनिधिक तत्त्वावर 15 महिलांना कर्जवाटप करण्यात आले. सिन्हा म्हणाल्या, ""लॉकडाउनच्या परिस्थितीत महिला उद्योजकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागातील महिलांना कमी व्याजदरामध्ये राष्ट्रीयीकृत बॅंकेकडून कर्ज उपलब्ध होण्यासाठी माणदेशी फाउंडेशन व स्टेट बॅंक ऑफ इंडिया एकत्र आले आहेत. कर्ज वितरणाबरोबर फाउंडेशनने तयार केलेले "क्रेडीट रेटिंग टुल' स्टेट बॅंकेने कर्जासाठी लागणाऱ्या आवश्‍यक कागदपत्रात समावेश केला आहे. त्यामुळे कर्जासाठी अर्ज करणाऱ्या महिला किती रकमेपर्यंत कर्ज घेण्यास पात्र आहेत याचीही माहिती बॅंकेला समजणार आहे.''

साताऱ्याच्या परीक्षकांकडून कराड जनता बॅंकेचे लेखापरीक्षण; आयुक्तांकडून आदेश

दरम्यान, उद्योजिकांच्या व्यवसायाला गती मिळण्यासाठी मुद्रा कर्ज योजनेंतर्गत शिशू, किशोर व तरुण या पातळीवर कर्ज वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये सुरुवातीला सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्‍यातील 39 महिला, तर सातारा जिल्ह्यातील 23 महिलांच्या कर्जाचे अर्ज बॅंकेत सादर करण्यात आल्याचे सिन्हा यांनी सांगितले.

मकरंद पाटलांच्या पवित्र्यानंतर सहकारमंत्र्यांनी दिले 'किसन वीर'च्या चौकशीचे आदेश 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.