'फडणवीस घाम पुसायला 3-4 रुमाल खिशात ठेवताहेत, आता निवडणुकीत त्यांना पाणी पाजणार'; जरांगे पाटलांचा थेट इशारा

Manoj Jarange Patil : आपल्या लेकराला आयुष्याचे आरक्षण (Maratha Reservation) द्यायचे आहे. त्यासाठी मराठा समाजाने घरातून बाहेर पडावे.
Manoj Jarange Patil vs Devendra Fadnavis Chhagan Bhujbal
Manoj Jarange Patil vs Devendra Fadnavis Chhagan Bhujbalesakal
Updated on
Summary

'मराठ्यांच्या आरक्षणाची ही लढाई साडेअकरा महिन्यांपासून सुरू असून, गरजवंत गरीब मराठा समाजासाठी आमचा हा लढा आहे.'

सातारा : आपल्या लेकराला आयुष्याचे आरक्षण (Maratha Reservation) द्यायचे आहे. त्यासाठी मराठा समाजाने घरातून बाहेर पडावे. आम्हाला आमचे आरक्षण द्या, नाहीतर तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही. सत्ताधाऱ्यांनी जास्त त्रास दिला, तर हा लढा मुंबईला नेण्याची आमची तयारी आहे. सगळ्या संकटांना सामोरे जाण्याची अगदी मरण पत्करण्याची मी तयारी ठेवली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही ११३ आमदार पाडून समाजाचे वर्चस्व दाखवून देऊ, असे आव्हान मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी येथे दिले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि छगन भुजबळ यांच्यावर कठोर टीका करत कितीही षडयंत्रे रचली गेली, तरी आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली काल कोल्हापुरातून कऱ्हाडमार्गे साताऱ्यात दाखल झाली. गांधी मैदानावर झालेल्या विराट सभेत जरांगे यांनी सज्जड शब्दांत सरकारला दम भरला.

Manoj Jarange Patil vs Devendra Fadnavis Chhagan Bhujbal
Manoj Jarange-Patil : '...तर आमचे उमेदवार अपक्ष लढणार'; विधानसभा निवडणुकीबाबत मनोज जरांगेंचे मोठे विधान

जरांगे म्हणाले, ‘‘मराठ्यांच्या आरक्षणाची ही लढाई साडेअकरा महिन्यांपासून सुरू असून, गरजवंत गरीब मराठा समाजासाठी आमचा हा लढा आहे. हा लढा बंद पडेल, असे काही नेत्यांना वाटत होते. तो बंद पाडण्यासाठी सगळ्यांनी ताकद लावली; पण मराठ्यांना उघडे पडू न देता मी त्या विरोधात उभा आहे. मी कधी मागे हटतोय याची वाट पाहात होते. त्यासाठी छगन भुजबळांसारखे नेते विरोधात लावले. त्यांचाही मी काटा केला. त्यांच्या मदतीला आणखी दहा-पंधरा नेते दिले. मराठा समाजाला या सर्वांनी घेरले आहे. त्यामुळे आरक्षणाची लढाई जिंकण्यासाठी समाजाने घरातून बाहेर पडावे.’’

‘‘आपल्या पुढे संकटे उभी केली जात आहेत. यामध्ये सरकार, काही मराठा नेते आणि सत्ताधारीही सहभागी आहेत. सातारा जिल्ह्यात जात पडताळणी होत नसल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. याकडेही सरकारने लक्ष द्यावे. येत्या आठ दिवसांत जातपडताळणीचे दाखले देण्यास सुरुवात करावी; अन्यथा त्यांना माझी ताकद दाखवतो. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आपण उमेदवार पाडणार असून, मुंबईत आपण वेगळा प्लॅन करणार आहोत. तेथे २० ते ३० हजार नमुने आपल्या विरोधात आहेत. एकंदर आपल्या लढ्यात मुस्लिम समाजही आपल्यासोबत आहे. मराठा समाजाचे प्रत्येक मतदारसंघात ५० हजारांचे मताधिक्य आहे. त्यामुळे आपण प्रत्येक मतदारसंघात उमेदवार पाडणारच, असेही ते म्हणाले.

Manoj Jarange Patil vs Devendra Fadnavis Chhagan Bhujbal
Manoj Jarange : 250 किलो फुलांचा 15 फुटी हार अन् 10 जेसीबीतून मनोज जरांगेंवर पुष्पवृष्टी; कराडात भव्य स्वागत

फडणवीसांला पाणी पाजणार

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, की सध्या देवेंद्र फडणवीस घाम पुसायला तीन-चार रुमाल खिशात ठेवत आहेत. आगामी निवडणुकीत त्यांनाही पाणी पाजणार आहे, असा इशारा श्री. जरांगे पाटील यांनी दिला.

भुजबळांच्या टोळीला पाडायचेच...

जरांगे पाटील म्हणाले, ‘‘सातारकरांच्या पायाला हात लावून सांगतो. आता तुम्ही घरातून बाहेर पडा, त्याशिवाय आरक्षण मिळणार नाही. या सर्वांनी आपल्याला उघडे पडायचे ठरवले आहे. आपला लढा मोडण्यासाठी त्यांनी काही टोळ्या सक्रिय केल्या आहेत. त्यात छगन भुजबळ यांची एक टोळी आहे. त्यांच्यासाठी आणखी दहा ते पंधरा मुकादम नेमले आहेत; पण ते ज्या मतदारसंघात येतील तेथील उमेदवाराला मराठ्यांनी पाडायचे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा.’’

Manoj Jarange Patil vs Devendra Fadnavis Chhagan Bhujbal
'आता मराठ्यांच्यात दम आहे की, त्यांच्यात आहे हे दाखवून देवू'; मनोज जरांगेंचा राजकीय नेत्यांना थेट इशारा

तरुणांनो आत्महत्या करू नका...

समाजाची शक्ती व ताकद वाढवायची असून, रक्ताचा एक थेंबही न सांडता आपल्याला आरक्षणाचा हा लढा यशस्वी करायचा आहे. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांनो आत्महत्या करू नका. मी तुम्हाला आरक्षण मिळवून देतो; पण हे पाच मुद्दे लक्षात ठेवा, एकमेकाला मदत करायला शिका, आपली जात मोठी कशी होईल ते शिका, घराच्या बाहेर पडा, फोनचा वापर एकमेकाला जागे करण्यासाठी करा, निवडणूक होईपर्यंत नेत्यांच्या मदतीने देवदर्शनाला जायचे टाळा. बोगस मतदान बाहेर काढा, शंभर टक्के मतदान करा, असे आवाहनही त्यांनी केले.

सातारकरांना निमंत्रण

येत्या २९ ऑगस्टला सातारकरांनी आंतरवाली सराटीत यावे. तेथे आपल्याला आगामी विधानसभेच्या निवडणुकीबाबत ठरवायचे आहे. उमेदवार पाडायचे की नाही, तसेच आपले उमेदवार उभे करायचे ठरले, तर सर्वांनी मतदान करायचे, कोणाचीही भीती न घेता शंभर टक्के मतदान करायचे, असा सल्ला त्यांनी सातारकरांना दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()